मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात आज 'ऑरेंज अलर्ट', 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात आज 'ऑरेंज अलर्ट', 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 26, 2024 07:26 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे राज्यामधील हवामानावर मोठा परिमाण होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता असून विदर्भात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update (HT)

Maharashtra Weather Update : वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे राज्यामधील हवामानावर परिमाण झाला आहे. पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे विदर्भात आज ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. या सोबतच वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे देखील वाहणार असल्याने नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

pimpri-chinchwad Crime : आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या; पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथील घटना

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या ७२ तासात कोकण व्यतिरिक्त राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच-सात दिवसात कोकणामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

PM Modi : खोल समुद्रात उडी मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पाण्याखाली बुडालेल्या द्वारकेची पुजा; पाहा फोटो

मध्य महाराष्ट्र पुढील पाच ते सात दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या एक दोन जिल्ह्यांमध्ये अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर दिवशी मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ७२ तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज हिंगोली व नांदेड याबाबत मेघगर्जना व विजांच्या कडकडे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २६ व २७ तारखेला मेघ गर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व गारपीट होण्याची शक्यता आहे. २८ व २९ तारखेला विजांचा कडकडाट व तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या खान्देश भागातील नाशिक नगर जळगांव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

असे असेल पुण्याचे हवामान

पुणे व आजूबाजूच्या परिसरात मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. २६ व २७ तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहील. १ तारखे नंतर दोन-तीन दिवस पुन्हा वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. तर पुढील ४८ तासात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही.

IPL_Entry_Point