Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर आजपासून कमी होणार आहे. आज राज्यातील काही जिल्हयात पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हयात आज पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदरुबार, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर वर्धा वाशिम जिल्हयात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्र विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पुणे, सातारा रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासहित काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, धारशिव या जिल्ह्यामध्ये मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासहित तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये मेघ गर्जना व वीजांच्या कडकडाटा सहित काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून विधानसभा टासहित हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर २९ सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.