Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला यलो अलर्ट, वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला यलो अलर्ट, वाचा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला यलो अलर्ट, वाचा

Updated Aug 29, 2024 07:14 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात आज देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यात आणि कोकणात व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला यलो अलर्ट, वाचा
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला यलो अलर्ट, वाचा

विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मध्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्याच्या प्रभावाखाली आज २९ तारखेला उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरात ते मध्य केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे आज राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी येथे पुढील चार ते पाच दिवस सिंधुदुर्ग येथे पुढील दोन दिवस तर ठाणे येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे व सातारा येथील घाट विभागात पुढील चार ते पाच दिवस तर कोल्हापुर येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव व अहमदनगर येथे उद्यापासून तीन ते चार दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सोलापूर हिंगोली नांदेड लातूर व धाराशिव येथे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उद्या ३० तारखेपासून मेघगर्जना विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.

पुण्यात आज असे असेल हवामान

पुणे व आजूबाजूच्या परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे 29 व 30 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर