Maharashtra weather Update : राज्यात आज बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुहिल चार ते पाच दिवस हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यामध्ये हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबईतही उकाडा कायम राहणार आहे. तर कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याने येथील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मधील चारही उपविभागांमध्ये पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर एवढा राहणार आहे. आज कोकण गोव्यामध्ये हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र गारा पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांमध्ये गारा पडण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील नांदेड लातूर व धाराशिव येथे पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी वरील जिल्ह्यासह आणखी काही जिल्ह्यात वादळी वारा, गारपीट, तसेच मेघगर्जना वीजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भामध्ये पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. १९ मे नंतर राज्यांमधील पावसाची व्याप्ती व तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या