मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : सूर्य ओकतोय आग! अकोला, चंद्रपूर, यवतमाळला हीट वेव्ह तर उर्वरित राज्यात पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : सूर्य ओकतोय आग! अकोला, चंद्रपूर, यवतमाळला हीट वेव्ह तर उर्वरित राज्यात पावसाची शक्यता

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 28, 2024 06:56 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात मराठवाडा, विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. आज देखील विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मराठवाडा, विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे.
राज्यात मराठवाडा, विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात मराठवाडा, विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. आज देखील विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस तसेच विदर्भात २८ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, चंद्रपूर, यवतमाळ दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

विदर्भात नागपूर येथे आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी ब्रम्हपुरी येथे ४७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात हे सर्वाधिक तापमान होते.

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचा आमदार गोत्यात! ससुनच्या 'त्या' डॉक्टरची केली होती शिफारस, पत्र व्हायरल

मान्सूनची उत्तरे सीमा ही आज कायम आहे. पुढील पाच दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस तसेच विदर्भात २८ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. विदर्भातील अकोला येथे आजपासून पुढील तीन दिवस, चंद्रपूर, यवतमाळ येथे आजपासून पुढील दोन दिवस उष्णतेची लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात नागपूर येथे आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव व विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Pune Porsche Accident : कल्याणी नगर अपघात प्रकरणी आलीशान पोर्शे कारची कंपनीच्या तज्ञांनी व पोलिसांनी केली तपासणी

कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

कोकणात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर येथे २८ ते ३०, सातारा येथे २७ ते २९ आणि अहमदनगर व पुणे येथे आज दिनांक २८ रोजी मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील आज परभणी येथे उद्या नांदेड लातूर व उस्मानाबाद येथे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Asaduddin Owaisi on Modi : "तुम्ही चीनसोबत डिस्को डान्स करत आहात', पंतप्रधान मोदींच्या ‘मुजरा’ वर ओवैसींचा पलटवार

पुण्यात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता

पुणे शहर व परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघ गर्जना विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील तापमान

पुणे २९.९, अहमदनगर ३६.२, जळगाव ४२, कोल्हापुर ३०.१, महाबळेश्वर २२. मालेगाव, ४१.८, नाशिक ३३.३, सांगली ३०.४, सातारा २८.६, सोलापुर ३४.८, मुंबई ३३.८, सांताक्रूज ३४.६, अलिबाग ३३.५, रत्‍नागिरी ३२.७, पणजी ३३.९, डहाणू ३५, उस्मानाबाद ३७.६, औरंगाबाद ३७.४, परभणी ४१.२, नांदेड ४०.८, बीड ४१.१, अकोला ४२.२, अमरावती ४५, बुलढाणा ३९.४, ब्रम्हपुरी ४७.१, चंद्रपुर ४४.८, गोंदिया ४४.५, नागपुर ४५.६, वाशिम ४१.२, वर्धा ४५, यवतमाळ ४५.५

टी-२० वर्ल्डकप २०२४