Maharashtra Weather Update : जुलै महिन्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसामुळे राज्यात काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. कोकणात आणि पुण्यात पावसाचा जोर जास्त होता. पण, ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागातून पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात आज विदर्भ वगळता इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत असलेला समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा सध्या विरून गेलेला आहे. यामुळे राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. किनारपट्टी भागत देखील काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांच्या मैदानी भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील घाट विभागाला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात रळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या पावसाचा एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे.