Maharashtra Weather update : राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान कमालीचे वाढले आहे. हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाल्याने कमाल – किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात अकोल्यात सर्वांधिक ४१.५ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली. या सोबतच वर्धा, मालेगाव, परभणी, अमरावती जिल्ह्यात देखील पारा ४१ डिग्री सेल्सिअसच्या जवळ पोहचला. या उष्णतेच्या झळा आणखी पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. अकोल्यात ४१.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्या शिवाय अमरावती, वर्धा, यवतमाळ, परभणी, जेऊर, मालेगाव, सोलापूर येथे देखील पारा हा ४० पार गेला. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्र राज्यावर हवामानाची कोणतीही खास सिस्टीम नाही.
परंतु साउथ इंटेरियर कर्नाटका ते विदर्भापर्यंत असलेली व हवेची विसंगती किंवा द्रोणीक रेषा अजुनही कायम आहे. एक पश्चमी विक्षोभ २९ मार्चला उत्तर भारतावर परिमाण करणार आहे. त्यामुळे नॉर्थ वेस्टर्ली आद्रता युक्त वारे कोकण व मध्य महाराष्ट्रात येत आहेत. तसेच बंगालच्या उपसगरावरून येणारे साऊथ साऊथ ईस्टर्ली किंवा सदर्ली वारे आद्रात युक्त वारे विदर्भ आणि लगतच्या भागावर येत आहे. त्यामुळे राज्यात आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे जाणवणारे वास्तविक कमाल तापमान हे वास्तविक कमाल तपमानापेक्षा जास्त जाणवेल. २९ मार्च नंतर राज्यात पश्चिमी विक्षोभामुळे राज्यात २९ ते ३१ मार्च पर्यन्त आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या काळात किमान तापमानात किंचित वाढ व कमाल तापमानात किंचित्त घट होण्याची शक्यता आहे.
पुण्यात असे असेल हवामान
पुणे आणि परिसरात पुढे तीन ते चार दिवस आकाश मुखत: निरभ्र राहणार आहे. व तापमानात फारसा बदल होणार नाही. २९ ते ३१ मार्च दरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहील. त्यामुळे कमाल तापमाणात किंचित वाढ तर किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात मंगळवारी तापमानात हे ३९.४ डिग्री सेल्सिअस तपमानची नोंद झाली. वाढत्या उन्हामुळे पुणेकर सध्या हैराण झाले आहे. दरम्यान, उष्माघातापासून वाचण्यासाठी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.