Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज देखील राज्याच्या काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळीवाऱ्यासह पवसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर मात्र, राज्यात पुन्हा तापमानात वाढ होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली या तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांना आज हवमान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्यांची द्रोणीय रेषा आज ही कोमोरीन एरियावर असलेल्या चक्रीय स्थिती पासून कोकण गोव्यापर्यंत केरळ व कर्नाटक वरून गेली आहे. या सोबत एक पूर्व पश्चिम द्रोणिका रेषा राजस्थानच्या दक्षिण भगातून तर लगतच्या गुजरातवर असलेली चक्रीय स्थिती ही उत्तर ओडिषापर्यंत मध्य प्रदेश छत्तीसगड व दक्षिण झारखंड वरून गेली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावर असलेल्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात येणाऱ्या आद्रतेचे प्रमाण वाढले असून यामुळे आज देखील राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मराठवाड्यात तर विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली या तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता राज्यात पावसाचा जोर ओसारणार आहे.
राज्यात पाऊस कमी होणार आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर आता राज्यात उष्णतेची लाट येणार आहे. उद्यापासून बहुतांश राज्यात कोरडे हवामान राहणार आहे. मुंबईसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. तर पुण्यात तापमान हे ४० पार गेले आहे.
मुंबई व उपनगराबाबत देखील तापमान वाढणार आहे. मुंबईत उकाडा वाढणार असल्याने नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिवसा कोरडे हवामान राहणार आहे. तर आकाश निरभ्र राहणार आहे.
मुंबईकरांना पुढील ७२ तासांसाठी सर्वात वाईट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. कारण उत्तर कोकणातील काही भागात तापमान ३८-३९ डिग्री सेल्सियस, सांताक्रूझ, ठाणे ४२ डिग्री सेल्सिअस, नवी मुंबई ४१ डिग्री सेल्सिअस, कल्याण ४३ डिग्री सेल्सिअस, ४४ डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये उष्णतेची लाट येणार असून ही लाट मुंबईसह कोकणात पसरणार असल्याने तापमान वाढणार आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये या साठी दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. तर दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. पुढील काही दिवस कमाल तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यात तापमान हे ४० पर्यंत गेले आहे. रविवारी ३९.९ डिग्री सेल्सिअस तपमानची नोंद झाली.