Maharashtra Weather Update : हवामान विभागाचा हायअलर्ट! राज्यात ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : हवामान विभागाचा हायअलर्ट! राज्यात ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : हवामान विभागाचा हायअलर्ट! राज्यात ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Updated Jul 06, 2024 07:18 AM IST

Maharashtra weather update : राज्यात आज काही जिल्ह्यात मुळसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घराबाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाचा हायअलर्ट! राज्यात या जिल्ह्यात अतिमुसळधार पवासचा इशारा
हवामान विभागाचा हायअलर्ट! राज्यात या जिल्ह्यात अतिमुसळधार पवासचा इशारा (PTI)

Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील ९ तारखेपर्यंत  काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना देखील पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

समुद्रसपाटीवर दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक पाच जुलै रोजी रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर घाट विभागातील पुणे सातारा व कोल्हापूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार तर ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात तसेच ७ ते ९ जुलै दरम्यान रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना नांदेड या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचे ताशी ४० ५० किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आहे.

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया वर्धा, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. उद्या धुळे, जळगाव, नाशिक अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जालना नांदेडमध्ये देखील वीजांच कडकडाट सोसायट्याच्या वादळी वाऱ्यासह २० ते ४० किलोमीटर वेगाने पाऊस पडल्याची शक्यता आहे. तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दिनांक ७ ते ९ जुलै दरम्यान विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडात व सोसाच्याच्या वादळी वाऱ्यासह ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिनांक ७ ते ९ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, जिल्ह्यातील घाट विभागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ तारखेपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. तर सायंकाळी पावसाची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर