मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather update : राज्यात आजही पाऊस! विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह बरसणार! असे असेल हवामान

Maharashtra weather update : राज्यात आजही पाऊस! विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह बरसणार! असे असेल हवामान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2024 07:41 AM IST

Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही (weather update) दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान (unseasonal rain in maharashtra) घातले आहे. वादळी वारे आणि गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज देखील राज्यात वादळी वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात आजही पाऊस होण्याचा अंदाज आहे.  विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
राज्यात आजही पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. (HT)

Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. दरम्यान, आज देखील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Pune Traffic issue : पुण्यात अवजड वाहनांना 'नो एन्ट्री'! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; वाचा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, एक पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालयापासून हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. या पश्चिमी विक्षोभा पासून एक द्रोणीका रेषा उत्तर अरबी समुद्रापर्यंत जात आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणारे आद्रता युक्तवारे उत्तर भारत व उत्तर मध्य भारतापर्यंत येत आहेत. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरावरून प्रती चक्रीय साऊथ ईस्ट साऊथ साऊथ ईस्टर्ली वारे हे राज्यात येत आहेत. विशेषतः हे वारे साऊथ ईस्ट इंडिया पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे आज राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. आज अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. उद्यापासून राज्यात विदर्भ वगळता हवामान कोरडे राहील. तीन तारखे नंतर राज्याच्या उत्तर मध्य भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Nanded Accident: बारावीचा पेपर सोडवून घरी परतताना अपघात, २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नांदेड येथील घटना

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि परिसरात आज ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील ४८ तासात पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. तीन तारखेला आकाश निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. चार मार्च नंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. नंतर अंदाजे चार ते पाच डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे.

राज्यात शनिवारी देखील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पुण्यात देखील काही परिसरात हलका पाऊस झाला. मुंबईत सध्या दमट आणि गरम हवामान असून दुपारी अंशतः ढगाळ वातावरण आहे.

IPL_Entry_Point