Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. बहुतांश जिल्ह्यात आज हवामान कोरडे राहणार आहे. असे असले तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार तीव्र कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य कडे संपून नैऋत्य उत्तर प्रदेश व नगरच्या भागावर आहे. वातावरणाचा खालच्या थरातील कमी दाबाचा पट्टा हा दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे. आज १३ सप्टेंबरला कोकणातील काही जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक १३ सप्टेंबरला कोकणात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्याचा घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात १६ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
कोकण मध्ये महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे.