मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा; कोकणात, घाट विभागात ऑरेंज तर पुणे, मुंबईत यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा; कोकणात, घाट विभागात ऑरेंज तर पुणे, मुंबईत यलो अलर्ट

Jul 01, 2024 09:06 AM IST

Maharashtra Weather Update : राज्याच्या बहुतांश भगात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात ऑरेंज तर पुणे, मुंबई, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ज्यात जोरदार पासवाचा इशारा; कोकणात, घाट विभागात ऑरेंज तर पुणे, मुंबईत यलो अलर्ट
ज्यात जोरदार पासवाचा इशारा; कोकणात, घाट विभागात ऑरेंज तर पुणे, मुंबईत यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पुणे, मुंबई, पालघर, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने येथेही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून इथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आज १ जुलै रोजी नैऋत्य मौसमी वारे पश्चिम राजस्थान व हरियाणाच्या आणखी काही भागात उर्वरित उत्तर प्रदेश मध्ये पंजाबचे आणखी काही भागात तर हिमाचल प्रदेश आणि जम्मूच्या उर्वरित भागात भागात दाखल झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात त्याची पश्चिम राजस्थान हरियाणा चंदीगड व पंजाबचा आणखी काय भागात प्रगती होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. काल वायव्य बंगालचा उपसागर व उत्तर ओडिसा व पश्चिम बंगालवर असलेले कमी दाब क्षेत्र सकाळी विरून गेले आहे. तर समुद्रस पाटीवरील कमी दाबाची रेषा आज महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीलगत स्थिराली आहे.

कोकण गोवा आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज १ रोजी रायगड रत्नागिरी जिल्ह्यात व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात १ जुलैला नंदुरबार पालघर जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्हा तसेच सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुळसाधार पावसाची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात पुढील काही दिवस अती मुळसाधार पावसाचे

पुढील पाच दिवस कोकणात बहुतांश जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व ताशी २० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने विदर्भात यालो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत ढगाळ हवामान

मुंबई शहर आणि उपनगरात आज सामान्यतः आकाश ढगाळ राहणार आहे. तर अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात देखील अनुक्रमे ३१ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान २५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल.

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा व ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात घाट विभागात ऑरेंज अलर्ट

पुणे आणि परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून अधून मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज आणि उद्या घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने घाट विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर