Maharashtra Weather Update : हवामान राज्यात आज व पुढील काही दिवस उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज गोव्यात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामान कोरडे राहील. तर पुढील दोन दिवस मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बीड, लातूर, नांदेडसह काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट व पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यात सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दोन्ही जिल्ह्यात तापमान ४४.३ डिग्री सेल्सिअस ऐवढे होते.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाडा व लगतच्या भागावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही आता मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत जात आहे. त्यामुळे आज गोव्याचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सहा व सात तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नांदेड व लातूर जिल्ह्यात ६ व ७ तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहतील. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात अकोला जिल्ह्यात पाच व सहा तारखेला तर चंद्रपूर जिल्ह्यात पाच तारखेला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सात तारखेला मेघ गर्जना, विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ९ मेपर्यंत मेघ गर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि हवामान आजूबाजूच्या हवामानाचा परिसरात ७ मे पर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ११ मे पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुण्यात रविवारी तापमानात वाढ झालेली पाहायला मिळाली. पुण्यात ४०.३ डिग्री सेल्सिअस तापनाची नोंद झाली.