मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather : राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा 'हुडहुडी; पहिल्या आठवड्यात 'थंडी'चा कडाका जोर वाढणार

Maharashtra Weather : राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा 'हुडहुडी; पहिल्या आठवड्यात 'थंडी'चा कडाका जोर वाढणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 01, 2022 11:01 AM IST

Maharashtra Weather : राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचा जोर वाढला होता. मात्र, काही दिवसंपासून थंडी ही कमी झाला होता. डिसेंबर महिन्यात आता पुन्हा थंडीचा जोर पुन्हा वाढणार आहे.

राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे
राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी ही पुन्हा पुनरागमन करणार आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तसेच काही ठिकाणी कोरडे हवामान वाढणार असल्याने थंडीचा कडाका वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तापमान खाली कोसळणार आहे.

राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमान खूप खाली आहे होते. अनेक जिल्ह्यात तापमान हे १२ डिग्री सेल्सिअस पर्यन्त आले होते. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात तापमान हे सर्वाधिक कमी होते. मात्र, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी ही कमी झाली होती. डिसेंबर महिन्यात आता पुन्हा हळूहळू थंडीचा जोर वाढणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव आणि नाशिक या चार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे. मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे.

वाढत्या थंडीमुळे पिकांवर देखील परिणाम होत आहे. पिके थंडीमुळे सूकत आहे. आधी पाऊस आता थंडीचा जोर वाढणार असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग