Nashik School: वाढत्या थंडीमुळे नाशिकमधील शाळांच्या वेळेत बदल, आता किती वाजता शाळा भरणार?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik School: वाढत्या थंडीमुळे नाशिकमधील शाळांच्या वेळेत बदल, आता किती वाजता शाळा भरणार?

Nashik School: वाढत्या थंडीमुळे नाशिकमधील शाळांच्या वेळेत बदल, आता किती वाजता शाळा भरणार?

Dec 11, 2024 10:04 AM IST

Nashik School Timing Changed: वाढत्या थंडीचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून नाशिकमधील शाळांच्या वेळत बदल करण्यात आला आहे.

वाढत्या थंडीमुळे नाशिकमधील शाळांच्या वेळेत बदल
वाढत्या थंडीमुळे नाशिकमधील शाळांच्या वेळेत बदल

Maharashtra Weather News: राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह वाढल्याने राज्यातील बहुतांशी भागात गारठा वाढला असून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त जाणवत आहे. नाशिकमध्ये किमान तापमानात ४ अंश सेल्सिअसने घट झाली. नाशिकमध्ये मंगळवारी ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले.

कडाक्याची थंडी वाढल्याने नाशिकमध्ये मनपा हद्दीतील शाळा एक तास उशिरा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका शिक्षण विभागाने वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, महापालिकेच्या शाळा सकाळी ०७.०० ऐवजी सकाळी ०८.०० वाजता भरणार असल्याचे सांगण्यात आले. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होवू नये, यासाठी मनपाने निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र गाठरले

राज्यभरात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी परतली आहे.उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. राज्यातील किमान तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. राज्यात मंगळवारी जळगावात ८.० अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर, नाशिक ९.४ अंश सेल्सिअस, अहमदनगर ११.७ अंश सेल्सिअस, पुणे १२.३ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर १२.२ अंश सेल्सिअस, परभणी १२.५ अंश सेल्सिअस आणि अकोल्यात ११.८ सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

 

देशातील हवामान

हवामान खात्याने पश्चिम राजस्थानमध्ये ९ ते १४ डिसेंबर, पूर्व राजस्थानमध्ये १० ते १४ डिसेंबर, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ११ ते १४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. पंजाबमध्ये १० डिसेंबरपर्यंत, उपहिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, हिमाचल प्रदेश आणि १० ते १३ डिसेंबर दरम्यान दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

कुठे पावसाची शक्यता

पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये ९ डिसेंबरला, पश्चिम उत्तर प्रदेशात ९ डिसेंबरला आणि उत्तराखंडमध्ये ९ आणि १० डिसेंबरला उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल येथे १० ते १३ डिसेंबर, किनारपट्टीआंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा येथे ११ आणि १२ डिसेंबर, केरळ, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, १३ डिसेंबरला कर्नाटकात पावसाची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर