Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट-maharashtra weather heavy rain in some district in the state meteorological department has issued an important alert ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट

Sep 22, 2024 08:45 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात हा आठवडा पावसाचा राहणार आहे. मॉन्सून परतीचे वेध लागले असतांना राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान देण्यात आला आहे.

राज्यात 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट
राज्यात 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट (HT_PRINT)

Maharashtra Weather Update : मॉन्सूनच्या परतीचे वेध लागले असतांना राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. दरम्यान आज देखील, विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार २३ सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून नैऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण विभागांमध्ये महाराष्ट्रात ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबर रोजी सातारा, सांगली, अहमदनगर तर २१ व २२ सप्टेंबर रोजी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २३ ते २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात तर २३ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व कोकण गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर २४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

कोकण, गोवा, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे. तर २५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे कोकण गोवा मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात घाट विभागासाठी यलो अलर्ट

पुणे सर्व परिसरात आज व उद्या आकाश ढगाळ राहून दुपारी व संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस आकाश सामान्य ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक २५ ते २७ सप्टेंबर रोजी आकाश सामान्यता ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान घाट विभागामध्ये यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Whats_app_banner