मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Monsoon in Maharashtra : पाऊस आला रे.. मान्सून ४ दिवसात महाराष्ट्र व्यापणार, अनेक जिल्ह्यांत धो-धो बरसणार!

Monsoon in Maharashtra : पाऊस आला रे.. मान्सून ४ दिवसात महाराष्ट्र व्यापणार, अनेक जिल्ह्यांत धो-धो बरसणार!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 11, 2023 08:12 PM IST

Monsoon in Maharashtra : पुढील काही तासांतमान्सून कोकणातूनपुढे सरकत मुंबईतधडकण्याची शक्यता आहे. मान्सून पावसास अनुकूल वातावरण तयार झाल्याने राज्यात पुढील चार ते५दिवस मेघगर्जनांसह पावसाचा इशाराहवामान विभागाने दिला आहे.

Monsoon Update
Monsoon Update

Monsoon Latest Update : बहुप्रतिक्षेत असेलल्या मॉन्सून अखेर राज्यात धडकला आहे. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून येत्या चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुढील काही तासांत मान्सून कोकणातून पुढे सरकत मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. मान्सून पावसास अनुकूल वातावरण तयार झाल्याने राज्यात पुढील चार ते ५ दिवस मेघगर्जनांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक शहरात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशचा भाग आणि पश्चिम बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल. तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तळकोकणासह अनेक ठिकाणी आज मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली.

 

पुढील दोन दिवसात मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबारसह मराठवाडा व विदर्भाला जोरदार पावसाचा तडाखा बसणार आहे. राज्यात १५ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या काळात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel