मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather forecast : राज्यात आज व उद्या पावसाचा अंदाज, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती

Weather forecast : राज्यात आज व उद्या पावसाचा अंदाज, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 30, 2023 05:36 PM IST

Maharashtra Weather forecast : हवामान विभागाने दोन दिवस पुन्हा राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मार्च महिना संपत असताना आता राज्यातील हवामानात मोठे फेरबदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाआहे.

Weather forecast
Weather forecast

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या महिनाभरापासून मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळत असलेल्या अवकाळी पावसानं विश्रांती घेतली होती. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र हवामान विभागाने दोन दिवस पुन्हा राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मार्च महिना संपत असताना आता राज्यातील हवामानात मोठे फेरबदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कधी उन्हाचा तडाका तर कधी ढगाळ वातावरण होऊन पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान,आज आणि उद्या (३० व ३१मार्च) दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरणासोबत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनीसावधानता बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई व उपनगरे,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, विदर्भातील बुलढाणा, गोंदिया, वाशिम, गडचिरोलीसह जवळपास ११ जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी कोसळणार आहेत. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

२ दिवस ढगाळ वातावरमानंतर पुन्हा उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

 

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला होता. दरम्यान,आता पुनहा तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IPL_Entry_Point