Maharashtra Weather Update: एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट

Maharashtra Weather Update: एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट

Jan 28, 2025 08:01 AM IST

Maharashtra Weather Update : पुढील काही तासांत राज्यात तापमानात मोठा बदल होणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट
एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठे बदल झाले आहे. पुढील २४ तासांत यात आणखी बदल होणार आहे. पुढील २४ तासांत किमान तापमानात तब्बल २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. काही भागांमध्ये तापमान वाढले आहे. तर काही ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी थंडी वाढली आहे. राज्यात थंडी आणि उष्णता या दोन्हीमुळे आजाराचे देखील प्रमाण वाढले आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी हलका गारठा व धुके पडत आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालयीन भागात दोन वेगवेगळ्या प्रकारचे पश्चिमी चक्रावात तयार झाले आहे. याचा गंभीर परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर दक्षिणेत देखील काही राज्यात पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यावर देखील होणार आहे. राज्याच्या हवामानात पुढील काही दिवस हवामानात बदल होणार आहे. राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या सोबतच कमाल तापमानातही वाढ होणार आहे.

पुण्यात तापमानात वाढ

पुण्यात सकाळी आणि रात्री थंडी पडत आहे. तर दुपारी कडक ऊन पडत आहे. यासह सकाळी हलके धुके देखील पडत आहे. पुढील काही दिवस पुण्यात आकाश निरभ्र राहून सकाळी धुके व थंडी पडण्याची शक्यता आहे.

मुंबईतही तापमान वाढले

मुंबईत देखील उकाडा वाढला आहे. राज्याच्या किनारपट्टीच्या भागात तापमानात मोठी वाढ होत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात उकाडा वाढत असून सरासरी तापमान ३३ ते ३४ अंशांदरम्यान राहणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं व काही प्रमाणात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं तापमानाची झालेली वाढ ही आणखी काही दिवस कायम राहणार आहे. मुंबई व उपनगरांमध्ये ३१ जानेवारीनंतर तापमान घट होण्याची शक्यता आहे.

 तापमान किती ?

राज्यात अहमदनगर येथे सोमवारी १२.९, औरंगाबाददमहे १६.१, बीडमध्ये १७, हिंगोलीमध्ये ११.८, जालनामध्ये १७.५, लातूरमध्ये १९.८, नंदुरबारमध्ये २०.१, पालघर २१.३, तर पुण्यात १३  ते १७.९ असे तापमान आहे.   

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर