NCP Sharad Pawar List : बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या; शरद पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीची ५ वैशिष्ट्ये
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP Sharad Pawar List : बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या; शरद पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीची ५ वैशिष्ट्ये

NCP Sharad Pawar List : बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या; शरद पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीची ५ वैशिष्ट्ये

Updated Oct 24, 2024 08:28 PM IST

NCP Sharad Pawar Candidate List : शरद पवार गटाच्या पहिल्या यादीचे सर्वात मोठे वैशिष्ये म्हणजे बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार महामुकाबला महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.

शरद पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीची ५ वैशिष्ट्ये
शरद पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीची ५ वैशिष्ट्ये

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली असून एकूण ४५ उमेदवारांना संधी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची नावं वाचून दाखवली. या यादीचे सर्वात मोठे वैशिष्ये म्हणजे बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार महामुकाबला महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. सर्वांना उत्सुकता असलेल्या बारामती मतदारसंघाच्या मैदानात शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. 

उद्धव ठाकरेंनी जसे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना घेरले आहे, तसेच शरद पवारांनी अजित पवारांच्या उमेदवारांविरोधात तगडे आव्हान निर्माण केले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत घड्याळासमोर तुतारीनं मोठं आव्हान निर्माण केलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पहिली यादीची वैशिष्ट्ये -

  1. बारामतीमध्ये आता बिग फाईट पहायला मिळू शकते. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी तुंबळ लढत येथे पाहायला मिळणार आहे. अजित पवार व पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात मुकाबला होणार आहे. शरद पवारांनी येथे अजित पवारांना तगडं आव्हान दिलं असून बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. 
  2. अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मंत्री धर्मराव आत्राम यांच्याविरुद्ध त्यांच्या लेकीलाच शरद पवारांनी मैदानात उतरवलं आहे. यामुळे येथे बात विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. आत्राम कुटुंबातील या फुटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलले आहे. 
  3. भाजपमधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी तिकीट दिली आहे. यामध्ये कागलमधून समरजीत घाटगे, दोन दिवसापूर्वी बेलापूरमधील संदीप नाईक तर इंदापूर येथील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता, या तीन नेत्यांना विधानसभेचे तिकीट दिली आहे.
  4. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक दिग्गज अजित पवारांसोबत गेले होते. त्या सर्वांविरोधात शरद पवारांनी तगडे आव्हान उभे करत अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तगडे उमेदवार उभे केले आहेत. बारामतीमध्ये अजित पवार विरोधात युगेंद्र पवार, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात देवदत्त निकम तर समरजीत घाडगे यांना हसन मुश्रीफांविरोधात तिकीट दिले आहे.
  5. पहिल्या यादीत इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील, काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख, राजेश पाटील, मुंब्रा कळवामधून जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली. तर पुण्याच्या एकाच जागेवर उमेदवाराची घोषणा केलीये. हडपसरमधून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे युवा नेते महेबुब शेख यांना बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उरलेल्या मतदारांची यादी मुंबईत जाऊन जाहीर केली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या