फडणवीसांच्या 'उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर सतेज पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर, आधीपासूनचं सर्वच काढलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  फडणवीसांच्या 'उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर सतेज पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर, आधीपासूनचं सर्वच काढलं!

फडणवीसांच्या 'उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर सतेज पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर, आधीपासूनचं सर्वच काढलं!

Nov 05, 2024 06:04 PM IST

Satej Patil On Devendra Fadnavis : उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालेली आहे. फडणवीसांच्या प्रश्नावर सतेज पाटलांनी म्हटलं की, मला वाटतं आता महाराष्ट्रातील जनता महायुतीला गायब करेल.२०तारखेला मतदान झाल्यावरहे त्यांना लक्षात येईलच.

देवेंद्र फडणवीस व सतेज पाटील
देवेंद्र फडणवीस व सतेज पाटील

kolhapur North Constituency Politics : विधानसभा निवडणुकीमधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. अंतिम क्षणी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर जिल्हातील राजकीय वातावरण कमालीचं तापल आहे. बंडखोर आमदार अर्ज मागे घेत नाही म्हणून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्याचा धक्कादायक व महाराष्ट्राच्या इतिहासातील कदाचित पहिलाच प्रकार कोल्हापुरात घडला आहे. ऐनवेळी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल्या मधुरिमाराजे यांनी अचानकपणे निवडणुकीतून माघार घेतली.

मधुरिमाराजे माघार घेणार असल्याचं कळताच सतेज पाटील तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्याठिकाणी खासदार छत्रपती शाहू महाराजही उपस्थित होते. या दोघांच्या समोरच मधुरिमाराजेंनी आपली उमेदवारी मागे घेत असल्याच्या अर्जावर स्वाक्षरी घेतली. हा काँग्रेससाठी मोठा धक्का असून मतदारसंघातून पंजा गायब झाला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला होता. याला सतेज पाटलांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

काँग्रेसने तिसऱ्या यादीत राजेश लाटकर (Rajesh Latkar)यांना उमेदवारी दिली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर त्यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र शेवटच्या क्षणी मधुरीमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटलांच्या संताराचा कडेलोट झाला. त्यांनी शाहू महाराजांसमोरच आपली नाराजी व्यक्त करत हा निर्णय पटला नसल्याचं सांगितलं. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? मी माझी ताकद दाखवली असती,अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज. हे मला काही मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती,असं म्हणत नाराजी व्यक्त केली. तसेच शाहूंच्या समर्थकांना सतेज पाटलांनी,हे अजिबात बरोबर नाही,तुम्ही जेवढ्यांनी आग लावली त्या सर्वांना सांगत आहे,असं म्हणत आपला संताप व्यक्त केला.

फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर

कोल्हापुरातील नाट्यमय घडामोडीनंतर फडणवीस यांनी म्हटले होते की, सगळा प्रकार आश्चर्यकारक आहे. ज्या काही घडामोडी झाल्यात त्यावरुन एक गोष्ट लक्षात आली की,या ठिकाणी उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस मात्र गायब झालेली आहे. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच सतेज पाटलांनी म्हटलं की, मला वाटतं आता महाराष्ट्रातील जनता महायुतीला गायब करेल. २० तारखेला मतदान झाल्यावरहे त्यांना लक्षात येईलच.

सतेज पाटील यांनी मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या प्रमुख घटनांचा पाढाच वाचून दाखवला. "महाराष्ट्रातील जनता मालवणमध्ये झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान विसरणार नाही. बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचारात कुणी पाठीशी घातलं विसरणार नाही. पुण्यात एका तरुणाला उडवलं गेलं हे विसरणार नाही. शेतकऱ्यांचा सन्मान राखलेला नाही हे विसरणार नाही. त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा ते २० तारखेनंतर गायब होतील,असा टोला सतेज पाटील यांनी फडणवीसांना लगावला.

Whats_app_banner