विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील बीकेसी मैदानावर आज महाविकास आघाडीची प्रचारसभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत पंतप्रधान मोदी व राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला. सत्ता आल्यावर मी प्रत्येक जिल्हात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आणि सुरतेलाही बांधणार आहे. शिवाजी महाराज म्हटलं की यांच्या अंगाची लाही लाही होते. देवा भाऊ आणि जाऊ तिथं खाऊ. मला मुंब्र्यात मंदिर बांधायचं चॅलेंज केलं.
मात्र ते विसरले की मुंब्र्याच्या वेशीवर शिवाजी महाराज, तुकाराम यांची वेस आहे. ज्या गद्दाराला तुम्ही फोडला आणि मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसवला. त्याच्या ठाण्यात तुम्हाला मंदिर बांधता येत नाही, असं वाटत असेल तर कशाला डोक्यावर बसवला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केला. विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी आहे.
लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला ३०००; राहुल गांधींकडून मविआच्या ५ गॅरंटींची घोषणा