
Shivsena Candidate Second List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे कुडाळमधून निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उतरवून सस्पेन्स संपवला आहे. त्याचबरोबर भाजपमधून आलेल्या अन्य दोन उमेदवारांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.संजय निरुपम यांना दिंडोशीमधून उमेदवारी दिली आहे. निलेश राणेंसह बळीराम शिरसकर, मुरजी पटेल आणि आनंद शेशराव भरोसे या भाजपमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२२ऑक्टोबर रोजी शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अशा पद्धतीने शिवसेनेकडून आतापर्यंत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. यानंतर भाजपचे आणखी तीन नेते धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्वमधून तर बाळापूरमधून बळीराम शिरसरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा भाजपकडून लढण्यासाठी मुरजी पटेल यांनी तयारी केली होती. पण हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याने मुरजी पटेल यांना शिवसेनेत प्रवेश केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे. रिसोड मतदारसंघातून माजी खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
1.अक्कलकुवा - आमश्या पाडवी
2.बाळापूर- बळीराम शिरसकर
3.रिसोड - भावना गवळी
4.हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
5.नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
6. परभणी-आनंद शेशराव भरोसे
7.पालघर - राजेंद्र घेड्या गावित
8.बोईसर (अज) - विलास सुकुर तरे
9.भिवंडी ग्रामिण (अज) - शांताराम तुकाराम मोरे
10.भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी
11.कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर
12.अंबरनाथ (अजा) - डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
13.विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे
14.दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
15.अंधेरी पूर्व - मुरजी कांनजी पटेल
16.चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते
17.वरळी - मिलींद मुरली देवरा
18.पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे
19.कुडाळ - निलेश नारायण राणे
20.कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षीरसागर
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून परभणीत आनंद शेशराव भरोसे यांना उमेदवारी जाहीरझाली असून त्यांनी कालच (शनिवारी) भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता भाजपाला जागा सुटणार नसल्याने भरोसे यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला.
संबंधित बातम्या
