मनसेच्या तरुण तडफदार नेत्याने ठाकरे गटात प्रवेश करताच म्हटले, ‘राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनसेच्या तरुण तडफदार नेत्याने ठाकरे गटात प्रवेश करताच म्हटले, ‘राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा’

मनसेच्या तरुण तडफदार नेत्याने ठाकरे गटात प्रवेश करताच म्हटले, ‘राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा’

Nov 07, 2024 08:21 PM IST

Akhil Chitre Join Thackeray Group : अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते. आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

मनसे नेते अखिल चित्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश
मनसे नेते अखिल चित्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Assembly Elections 2024: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्र यांनी मनसेची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटाचं शिवबंधन हाथी बांधलं आहे. अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते.

अखिल चित्रे यांच्या शिवसेना प्रवेशाने मुंबईत स्थानिक पातळीवर विद्यार्थी संघटना आणि युवा सेनेची ताकद वाढणार आहे. अखिल चित्रे हे मनसेचे तडफदार नेते मानले जायचे. पण त्यांनी अचानक विधानसभेच्या काळात ठाकरे गटात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेकडून तृप्ती सावंत यांना विधानसभेचं तिकीट दिल्याने अखिल चित्रे नाराज असल्याची माहिती येत होती. अखेर त्यांनी मनसे पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. ठाकरे गटातील प्रवेशानंतर चित्रे म्हणाले की, मी भारतीय विद्यार्थी सेनेचा युनिट प्रमुख, कॉलेजप्रमुख म्हणून राजकीय करिअरची सुरुवात केली होती. त्यामुळे जिथून सुरूवात केली तिथे परत यावसं वाटलं मला. त्यामुळे मी पुन्हा या पक्षात प्रवेश केला आहे, असं अखिल चित्रे यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे म्हणाले की, मी दुसऱ्याचे लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळवणार नाही. मग ज्या तृप्ती सावंत तीन-चार पक्ष बदलून आल्या. त्यांना लगेच उमेदवारी देण्यात आली. तृप्ती सावंत जिंकण्यासाठी लढल्या असत्या तर मी त्यांच्यासोबत असतो पण कोणालातरी पाडण्यासाठी तुम्ही जर निवडणूक लढवत असाल तर ते योग्य वाटत नाही. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यांना जिंकून आणायची जबाबदारी आता माझी आहे, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं.

राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा – चित्रे

मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. ठाकरे गटात प्रवेश करण्याआधी अखिल चित्रे यांनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं. खंत एकंच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला. राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा. असो, जय महाराष्ट्र!," असं अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

Whats_app_banner