Uddhav Thackeray: सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का? क्षणाचाही विलंब न लावता उद्धव ठाकरे म्हणाले...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का? क्षणाचाही विलंब न लावता उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray: सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का? क्षणाचाही विलंब न लावता उद्धव ठाकरे म्हणाले...

Jun 15, 2024 05:27 PM IST

Maha Vikas Aghadi Press Conference: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला.
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली. नुकतीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत लोकसभेपेक्षा विधानसभा अधिक ताकदीने लढवण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला. या बैनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा चांगलाच समाचार घेतला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूनै कौल दिला. राज्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. लोकसभा निवडणुकीत असे वातावरण होते की, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी लढवू शकत नाही. पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती खोटा हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही लढाई होती. मोदी सरकार हे आता एनडीएचे सरकार झाले . लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पारचा नारा दिला. अच्छे दिनाच्या प्रचाराचे काय झाले, मोदींच्या गॅरेंटीचे काय झाले? लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार रिक्षाच्या तीन चाकांसारखे आहे, केंद्रातील भाजप सरकारचीही अवस्था तशीच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय, त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, असेही सांगितले.

आगामी विधानसभेची निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आम्ही निवडणूक लढणार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. त्यानंतर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर ही संख्या ३१ वर पोहोचली. तर, महायुतीला अवघ्या ३१ जागांवर विजय मिळवता आला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर