पुणे जिल्ह्यात हाय व्हॉल्टेज ड्रामा! बंडखोरांनी वाढवले टेन्शन; जाणून घ्या २१ मतदार संघातील उमेदवारांची फायनल यादी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे जिल्ह्यात हाय व्हॉल्टेज ड्रामा! बंडखोरांनी वाढवले टेन्शन; जाणून घ्या २१ मतदार संघातील उमेदवारांची फायनल यादी

पुणे जिल्ह्यात हाय व्हॉल्टेज ड्रामा! बंडखोरांनी वाढवले टेन्शन; जाणून घ्या २१ मतदार संघातील उमेदवारांची फायनल यादी

Nov 05, 2024 07:59 AM IST

vidhan sabha election : पुणे जिल्ह्यात अर्ज माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली तर काही ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत लढण्याचा निर्धार केला आहे.

पुणे जिल्ह्यात हाय व्हॉल्टेज ड्रामा! बंडखोरांनी वाढवले टेन्शन; जाणून घ्या २१ मतदार संघातील उमेदवारांची फायनल यादी
पुणे जिल्ह्यात हाय व्हॉल्टेज ड्रामा! बंडखोरांनी वाढवले टेन्शन; जाणून घ्या २१ मतदार संघातील उमेदवारांची फायनल यादी

vidhan sabha election : पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांतील लढती सोमवारी दुपारी ३ नंतर फायनल झाल्या. पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, मावळ या लढती लक्ष्यवेधी ठरणार आहेत. यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होत आहे. तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील व दत्ता भरणे यांच्यात लढत होत आहे. तर या ठिकाणी शरद पवार गटाचे प्रवीण माने यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत लढण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी बहुतांश ठिकाणी बंडखोरी झाली असून महायुती व महाविकास आघाडी यांचे टेन्शन वाढले आहे.

पुणे जिल्ह्यात शरद पवार विरुद्ध अजित पवार

पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भाग असे मिळून पुणे जिल्ह्यात २१ मतदार संघ आहेत. राज्यात सर्वाधिक मतदार संघ असलेल्या पुणे जिल्हा आहे. यात बारामती, वडगाव शेरी, हडपसर, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी, इंदापूर, शिरूर, कसबा, कोथरूड, भोर वेल्हा मुळशी, मावळ, खेड, या प्रमुख मतदारसंघांत खरी लढत ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार, अशीच होणार असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि भाजप उमेदवार यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.

बारामतीकडे  राज्याचे लक्ष

पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लक्ष ही बारामती मतदार संघाकडे लागणार आहे. या ठिकाणी महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहे. त्यामुळेच या मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. या मतदार संघात काका पुतणे अशी लढत असली तरी शरद पवार व अजित पवार यांच्यातील लढत असेच पाहिलं जात आहे.

बंडखोर ठरतील निर्णायक

जिल्ह्यात सोमवारी राजकीय घडामोडींना वेग आला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असल्याने पक्षनेते बंडखोरांची मनधरणी करण्यात गुंतले होते. ज्यातील काहींनी नेत्यांच्या म्हणण्याला मान देत, काहींनी स्वतःच्या मागण्यांवर आश्वासन घेत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. असे असले तरी जिल्ह्यात काही मतदार संघात बंडखोरी कायम राहिली आहे. यात पुणे शहरात कसबा, शिवाजीनगर, पर्वती, तर जिल्ह्यात जुन्नर, इंदापूर, पुरंदर, भोर या मतदारसंघांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण ३०४ उमेदवार निवडणूक

पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये ३०३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज छाननीनंतर एकूण ४८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १७० उमेदवारांनी सोमवारी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक २१ उमेदवार चिंचवड मतदारसंघात असून, पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात २०, तर हडपसर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढणार आहेत, सर्वांत कमी प्रत्येकी ६ उमेदवार भौर आणि मावळ मतदारसंघात उभे आहेत.

पुणे जिल्ह्यातील यांच्यात होणार लढत

१ कसबा मतदार संघ :

आमदार रवींद्र धंगेकर, काँगेस

हेमंत रासने, भाजप

गणेश भोकरे, मनसे

कमल व्यवहारे, काँग्रेस बंडखोर

२) शिवाजीनगर

आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप

दत्ता बहिरट, काँग्रेस

मनीषा आनंद, काँग्रेस बंडखोर

३) कोथरूड

चंद्रकांत पाटील, भाजप

चंद्रकांत मोकाटे, उबाठा शिवसेना

किशोर शिंदे, मनसे

४) खडकवासला

भीमराव तापकीर, भाजप

सचिन दोडके, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

मयुरेश वांजळे, मनसे

५) हडपसर

चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रशांत जगताप, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

साईनाथ बाबर, मनसे

६) वडगावशेरी

सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

७) पर्वती

माधुरी मिसाळ, भाजप

अश्विनी कदम, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

आबा बागुल, काँग्रेस बंडखोर

सचिन तावरे, बंडखोर NCP शरद पवार

८) पुणे कॅन्टोन्मेंट

सुनील कांबळे, भाजप

रमेश बागवे, काँग्रेस

९) इंदापूर

हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रवीण माने, बंडखोर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

१०) बारामती

अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

युगेंद्र पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

अभिजीत बिचुकले, अपक्ष

११) पुरंदर

संजय जगताप, काँग्रेस

विजय शिवतारे, शिवसेना

संभाजीराव झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

१२) भोर-वेल्हा मुळशी

संग्राम थोपटे, काँग्रेस

शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

किरण दगडे पाटील, बंडखोर भाजप

कुलदीप कोंडे, शिवसेना बंडखोर

१३) मावळ

सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब भेगडे, अपक्ष

१४) खेड आळंदी

दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बाबाजी काळे, शिवसेना उबाठा

१५) आंबेगाव

दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

देवदत्त निकम, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

१६) जुन्नर

अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

आशा बुचके, भाजप बंडखोर

शरद सोनवणे, बंडखोर शिवसेना

१७) शिरूर हवेली

अशोक पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

१८) दौंड

राहुल कुल, भाजप

रमेशआप्पा थोरात, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

१९) पिंपरी

अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सुलक्षणा शीलवंत, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

मनोज गरबडे, वंचित

२०) चिंचवड

शंकर जगताप, भाजप

राहुल कलाटे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

मनोज गरबडे, वंचित

२१) भोसरी

महेश लांडगे, भाजप

अजित गव्हाणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

Whats_app_banner