Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले

Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले

Updated Oct 28, 2024 11:18 AM IST

Congress 4th Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली असून यामध्ये १४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसने अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार बदलला आहे.

काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर
काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर

congress fourth Candidatelist : काँग्रेसने आपली चौथी उमेदवार जाहीर केली आहे. यामध्ये १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या चौथ्या यादीत अंधेरी पश्चिम आणि संभाजीनगर पूर्व या मतदारसंघातील उमेदवारांची नावे बदलली आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून सोलापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला असतानाही काँग्रेसने येथून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Maharashtra vidhan sabha election 2024)

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेल्या भगिरथ भालकेंना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

अंधेरी पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसने याआधी सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ते वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याने अंधेरीतून लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी आता काँग्रेसने अशोक जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. तर, संभाजीनगर पश्चिममधून मधूकर देशमुख यांच्याऐवजी लहू शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरोरामधून प्रवीण काकडे यांना तिकिट जाहीर केले आहे. तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून संदीप पांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसने  आत्तापर्यंत ९९ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने  ८५ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ७६ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. 

काँग्रेसच्या चौथ्या यादीत कोणाला मिळाली संधी?

 

  1. अमळनेर- डॉ.अनिल शिंदे
  2. उमरेड - संजय नारायणराव मेश्राम (अनुसूचित जाती)
  3. आरमोरी - रामदास मसराम (एसटी)
  4. चंद्रपूर - प्रवीण नानाजी पाडवेकर (अनुसूचित जाती)
  5. बल्लारपूर - संतोषसिंग चंदनसिंग रावत
  6. वरोरा - प्रवीण सुरेश काकडे
  7. नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
  8. औरंगाबाद पूर्व- लहू एच. शेवाळे
  9. नालासोपारा - संदीप पांडे
  10. अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
  11. शिवाजीनगर- दत्तात्रय बहिरट
  12. पुणे कॅन्टोन्मेंट - रमेश आनंदराव भागवे (अनुसूचित जाती)
  13. सोलापूर दक्षिण - दिलीप ब्रह्मदेव माने
  14. पंढरपूर- भगीरथ भालके

काटोल मतदारसंघात मोठा ट्विस्ट..! अनिल देशमुखांची माघार, शरद पवारांनी अखेरच्या क्षणी बदलला उमेदवार

काँग्रेसने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतून याआधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमर पाटील सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात उतरवला आहे. त्यामुळे महाआघाडीतील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे. सोलापूर दक्षिणमध्ये  काँग्रेस आणि ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढत होणार की ठाकरे गट उमेदवारी माघार घेणार हे पाहणे महत्वाचे महत्वाचे ठरणार आहे

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या