मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022 Live Vote Counting Updates

Vidhan Bhavan

MLC Results 2022 Live: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी

Maharashtra Vidhan Parishad election result 2022 live vote counting: विधान परिषदेच्या १० जागांचं मतदान पार पडलं असून सध्या मतमोजणीला सुरू आहे.

Mon, 20 Jun 202203:47 PM IST

Maharashtra MLC Election Result 2022: शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर भाजपचे चार उमेदवार विजयी

शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे विजयी. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय व उमा खापरे विजयी झाले आहेत.

Mon, 20 Jun 202203:09 PM IST

Maharashtra MLC Election Result 2022: भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत बाद

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मतही बाद झालं आहे. मतपत्रिकेतील खाडाखोडीमुळं मत बाद झालं आहे. ही दोन्ही बाद मतं बाजूला ठेवल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे.

Mon, 20 Jun 202202:36 PM IST

Maharashtra MLC Election Result 2022: मतपत्रिकेवर पेनानं गिरवल्यामुळं मत झालं बाद

तिसऱ्या पसंतीच्या मतावर पेनानं गिरवण्यात आल्यानं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर ते मत बाद करण्यात आलं आहे.

Mon, 20 Jun 202202:34 PM IST

Maharashtra MLC Election Result 2022: महाविकास आघाडीला धक्का; रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झालं. त्यामुळं महाविकास आघाडी व भाजपमध्ये वाद सुरू झाला आहे. 

Mon, 20 Jun 202202:31 PM IST

Maharashtra MLC Poll Results 2022: छानणीत सर्व मते वैध. थोड्याच वेळात हाती येणार पहिला निकाल

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून छानणीत सर्व मतं वैध ठरली आहेत. थोड्याच वेळात पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Mon, 20 Jun 202202:05 PM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: निकालाआधीच शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व शिवसेनेचे सचिन अहिर यांच्या समर्थकांनी विधान भवनाबाहेर जल्लोष सुरू केला आहे.

Mon, 20 Jun 202201:39 PM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: अखेर दोन तासांनंतर मतमोजणी सुरू

भाजप आमदारांच्या मतदानावर काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपांमुळं रखडलेली विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अखेर दोन तासांनंतर सुरू झाली आहे. निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Mon, 20 Jun 202212:14 PM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: भाजपच्या दोन मतांवरील आक्षेप राज्य निवडणूक आयोगानं फेटाळला

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांनी गुप्त मतदान पद्धतीचा भंग केल्याचा काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगानं फेटाळला आहे. राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला आपला निर्णय कळवला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Mon, 20 Jun 202211:30 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप. मतमोजणी लांबणार

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीची मतमोजणीही लांबणार आहे. काँग्रेसनं भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेत ते बाद करण्याची मागणी केली आहे. गुप्त मतदान पद्धती असताना या दोघांनीही आपली मतपत्रिका दुसऱ्याच्या हातात दिल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. 

Mon, 20 Jun 202210:46 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व २८५ आमदारांचं मतदान

विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान पूर्ण झालं असून सर्व २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अटकेत असलेले अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदान करता आलं नाही. निवडणुकीची मतमोजणी पाच वाजता सुरू होणार आहे.

Mon, 20 Jun 202209:09 AM IST

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देहू दौरा रद्द

विधान परिषद निवडणूक व निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला देहू दौरा रद्द केला आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते देहूला जाणार होते.

Mon, 20 Jun 202209:04 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: हितेंद्र ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे तिन्ही आमदार विधान भवनात

सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्षाचे नेते गेल्या काही दिवसांपासून ज्यांची मनधरणी करत होते, ते बहुजन विकास आघाडीचे नेते, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर व राजेश पाटील मतदानासाठी विधान भवनात पोहोचले आहेत. ते कोणाला मतदान करतात याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

Mon, 20 Jun 202208:59 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: अपक्ष आमदार संजय (मामा) शिंदे यांनीही केलं मतदान

संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी गैरसमजुतीतून वक्तव्य केलं होतं. त्यांनी स्वत:ही ते सांगितलंय. त्यामुळं तो विषय आता संपलेला आहे. आता महाविकास आघाडीच्याच उमेदवारांचा विजय होईल, असं अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हटलं आहे.

Mon, 20 Jun 202208:36 AM IST

Laxman Jagtap in Vidhan Bhavan: भाजपचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी रुग्णवाहिकेतून विधान भवनात

भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून मतदानासाठी पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी देखील त्यांनी हजेरी लावली होती.

Mon, 20 Jun 202207:05 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: दुपारी बारा वाजेपर्यंत २०३ आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असून दुपारी १२ वाजेपर्यंत २०३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अजूनही काही आमदारांचं मतदान बाकी असून चार वाजेपर्यंत ते पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

Mon, 20 Jun 202206:34 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या १०४ आमदारांचं मतदान पूर्ण

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह १०४ आमदारांनी मतदान केलं आहे. सुधीर मुनगंटीवार व आजारी असलेले लक्ष्मण जगताप यांचं मतदान बाकी आहे. ते काही वेळातच मतदान करतील, असं पक्षसूत्रांनी सांगितलं.

Mon, 20 Jun 202206:25 AM IST

Pravin Darekar on MLC Election: महाविकास आघाडी सरकारवरील नाराजी या निवडणुकीत दिसेल - प्रवीण दरेकर

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरील नाराजी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आमदारांचा असलेला विश्वास या निवडणुकीत दिसेल. मतदान करणारे आमदार तीन ते साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. लोकांच्या मनात सरकारबद्दल काय आहे हे आमदार मतदानातून दाखवून देतील, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

Mon, 20 Jun 202206:25 AM IST

Bhai Jagtap on MLC Polls: आम्ही सगळी गणितं चांगल्या प्रकारे सोडवलेली आहेत - भाई जगताप

आम्ही सगळी गणितं चांगल्या प्रकारे सोडवलेली आहेत. संध्याकाळी त्याचा निकाल समोर येईल आणि महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार भाई जगताप यांनी व्यक्त केला आहे.

Mon, 20 Jun 202206:08 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: महाविकास आघाडीची एकजून संध्याकाळी दिसेल - संजय राऊत

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हातात हात घालून चालले आहेत. आमच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील. आम्हाला धोका आहे असं कुणी म्हणत असेल तर ते अर्धवट विधान आहे. धोका हा एकतर्फी नसतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Mon, 20 Jun 202206:00 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: ‘मविआ’चे सहा जण जिंकतील : भुजबळ

महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील, विधान परिषदेचे आमचे ६ उमेदवार जिंकतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Mon, 20 Jun 202206:00 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: राष्ट्रवादीचे ३ आमदार मुंंबई बाहेर

राज्यसभेच्या निवडणुकीत उशिरा पोहचलेले राष्ट्रवादीचे तीन आमदार विधान परिषदेच्या मतदानालासुद्धा उशिरा पोहचण्याची शक्यता आहे. अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते-पाटील आणि आशुतोष काळे हे अजुनही मुंबईत पोहोचलेले नाहीत.

Mon, 20 Jun 202206:00 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: पक्षादेश पाळायचा हे रक्तात भिनलंय - मुक्ता टिळक

पक्षाने दिलेला आदेश पाळायचा असतो आणि हे आमच्या रक्तात भिनलं असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी दिली. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या मुक्ता टिळक यांनी गंभीर आजाराशी लढा देत असतानाही राज्यसभेच्या मतदानाला याआधी उपस्थिती लावली होती. त्यानंतर आत विधान परिषदेच्या मतदानासाठीही त्या मुंबईला रवाना झाल्या आहेत.

Mon, 20 Jun 202206:00 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: 'बविआ'चे आमदार क्षितीज ठाकूर परदेशातून मुंबईत

बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर हे परदेशातून मुंबई दाखल झाले आहेत. बविआची तीन मते मिळवण्यासाठी चारही पक्षांकडून हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यात आली होती. 

Mon, 20 Jun 202206:00 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: भाजपचे पाच जण जिंकणार, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

भाजप पूर्ण तयार आहे. मतमोजणी सुरू झाली लक्षात येईल की भाजपने किती आत्मविश्वासाने ही निवडणूक लढवली. आम्ही पाचही जागा जिंकू असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

Mon, 20 Jun 202206:00 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: दहावी जागा जिंकणार कोण? भाजप-महाविकास आघाडीत चुरस

विधानसभेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी भाजपचे ४, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र भाजपचा पाचवा आणि काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडणून आणण्यासाठी आवश्यक असलेली मते दोन्ही पक्षांकडे नाहीत. 

Mon, 20 Jun 202205:59 AM IST

Maharashtra Vidhan Parishad election 2022: राज्यात आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक

राज्यात आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. मते फुटू नयेत यासाठी राज्यातील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या चारही प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये ठेवलं आहे.