Vidhan parishad election2024 : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होत असून ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक चुरशीची झाली आहे. आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज अपक्ष उमदेवार जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी एकजण माघार घेईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अर्ज माघारीची वेळ संपली तर कोणत्याही उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली नसल्याने आता निवडणूक अटळ आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार असल्याने १२ वा उमेदवार कोणाचा घात करणार, हे १२ तारखेला समजणार आहे.
महाराष्ट्रविधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून यासाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती.मात्र अर्ज माघारीची वेळ संपली तरी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही.
ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचे सर्व पक्षात मित्र आहेत. त्यांचे शिवसेनेच्या आमदारांसोबतच एकनाथ शिंदे यांच्यासीही चांगले संबंध आहेत. त्यातच शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी या दोन्ही गटांना मते फुटण्याची भीती आहे. राष्ट्रवादीचे १७ ते १८ आमदारशरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. यामुळे भाजपचे आमदार जरी एकत्र राहिले तरी शिंदे गट व अजित पवार गटाचे आमदार फुटल्यास महायुतीला मोठा फटका बसू शकतो.
भाजपकडूनपंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारीमिळाली आहे. यासाठी त्यांना११५ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. म्हणजेच १२ मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे ९ आमदार भाजपसोबत आहेत. शिल्लक तीन मतांची तजवीज करणे त्यांच्यासाठी कठीण नाही.
शिंदे गटाकडून माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांना आपल्या आमदारांव्यतिरिक्त ७ अतिरिक्त मते लागतील. अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाही सहा मतांची तजवीज करावी लागणार आहे. दरम्यान काँग्रेसचे दोन आमदार सध्या अजित पवार यांच्या गोटात असल्याचे बोलले जात आहे.
संख्याबळानुसार महायुतीचे ८ उमेदवार निवडून येऊ शकतात तर दोन उमेदवार मविआचे निवडून येऊ शकतात. तिसऱ्या उमेदवारासाठी मविआला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
संबंधित बातम्या