Swargate rape case : स्वारगेट बलात्कार प्रकरणी चौकशी अहवाल सादर;चार अधिकारी निलंबित
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Swargate rape case : स्वारगेट बलात्कार प्रकरणी चौकशी अहवाल सादर;चार अधिकारी निलंबित

Swargate rape case : स्वारगेट बलात्कार प्रकरणी चौकशी अहवाल सादर;चार अधिकारी निलंबित

Published Mar 12, 2025 10:44 AM IST

Swargate rape case : स्वारगेट बलात्कारघटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचा टपका ठेवत चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

स्वारगेट बस स्थानक (संग्रहित छायाचित्र)
स्वारगेट बस स्थानक (संग्रहित छायाचित्र)

Swargate rape case : स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये १६ फेब्रुवारी रोजी पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर घटनेची चौकशी करण्यात आली आणि अहवाल सादर करण्यात आला आहे, असे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केले.
 

स्वारगेट बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचा टपका ठेवत स्थानक प्रमुख आणि आगार प्रमुख यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीच्या अहवालानुसार, एसटी महामंडळाने बस स्थानकावर कार्यरत असलेल्या २२ सुरक्षारक्षकांना तातडीने बदली करण्याचा निर्णय घेतला. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या सूचना संबंधित सुरक्षा मंडळाला देण्यात आल्या आहेत.
 

या प्रकरणात हलगर्जीपणा आढळल्याने वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती पल्लवी पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक सुनील येळे, तसेच सहायक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढगे या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
 

यापुढे महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असेही निवेदन परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर