बेलारूसच्या वस्त्रोद्योग मंत्री तात्सियाना लुहिना यांनी नुकतीच तीन दिवसाची भारताला धावती भेट दिली. आपल्या या भारत भेटीत त्यांनी जवळपास तीन वस्त्रोद्योग कंपन्यांना आणि फॅशन डिझाईन करणाऱ्या संस्थांना मुंबई आणि कोईमतूर येथे भेटी दिल्या. कोईमतूर येथे ज्या टेक्स्टाईल मिल्स आहेत आणि फॅशन डिझायनिंग शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या संस्था आहेत त्यांनाही भेटी दिल्या. आपल्या या भेटीसाठी आपण अतिशय उत्सुक होतो असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की भारत आणि बेलारूस यांच्यात या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सहकार्य झाले पाहिजे आणि तसे करण्याचा आमचा विचार आहे.
सध्या बेलारूस भारतामध्ये वार्षिक दहा लाख दशलक्ष डॉलर्सचे टेक्स्टाईल निर्यात करते दोन्ही देशातील व्यापार या त्या त्या देशांच्या राष्ट्रीय चलनामध्ये आता होत आहे त्यामुळे दोन्ही देशातील व्यापाऱ्यांना हे अधिक सोपे जाईल असे त्या म्हणाल्या. बेलारूस मध्ये टेक्सटाईल ट्रेड हा विषय नॅशनल कमोडीटी मध्ये सामील आहे. मुंबईमध्ये त्यांनी नेस्कोच्या प्रदर्शनाला देखील भेट दिली. भारत आणि बेलारूस यामध्ये अधिकाधिक सहकार्य कसे होईल या करिता अधिक संशोधन आम्ही करत आहोत. वस्त्रोद्योगाच्या कोणकोणत्या क्षेत्रात दोन्ही देशांना सहकार्य करता येईल आणि विशेषतः महाराष्ट्र सरकार बरोबर आम्ही संशोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले .
बेलारूस मध्ये लिनन कपड्यांचे सर्वोत्कृष्ट उत्पादन होते आणि लिनन कपड्यांच्या निर्मितीसाठी बेलापूर जगभर प्रसिद्ध आहे.
याबाबत दोन्ही देशांना अधिक सहकार्य करण्याची गरज आहे व त्या दृष्टीने पावले उचली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत त्यांनी ऋषभ वर्ल्ड या संस्थेला देखील भेट दिली ही संस्था टेक्स्टाईल निर्मिती बरोबरच टेक्स्टाईल उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्याचे काम करते.
भारतीय तसेच जगातील इतर अनेक देशांना बेलारूस वस्त्रोद्योगाच्या शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देते आणि बेलारूस मध्ये काही दिवस राहण्याची संधी देते. एकूण आपली धावती भेट ही अत्यंत यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. बेलारुस हा एक कोटी लोकांचा छोटा देश आहे परंतु वस्त्रोद्योगांमध्ये त्यांनी चांगली प्रगती केल्याचे लुहिना यांनी सांगितले.
संबंधित बातम्या