Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, २८ दिवसात २३ जणांना उष्माघाताचा फटका-maharashtra temperature latest news heatwave conditions grip 23 heatstroke cases in just 28 days in state ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, २८ दिवसात २३ जणांना उष्माघाताचा फटका

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, २८ दिवसात २३ जणांना उष्माघाताचा फटका

Apr 03, 2024 09:07 PM IST

Heat Wave In Maharashtra : मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागात उष्माघाताच्या घटना समोर आल्या आहेत. २८ दिवसात उष्माघाताच्या २३ घटना समोर आल्या आहेत. त्यातील १० घटना १० दिवसात घडल्या आहेत.

महाराष्ट्रात उष्णतेची लाट
महाराष्ट्रात उष्णतेची लाट

Heat Wave in Maharashtra : महाराष्ट्राच्या सरासरी तापमानाने (Maharashtra temperature)  चाळिशी ओलांडली असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मार्च महिन्यात सूर्यदेव असा काही कोपला आहे की, लोकांना उष्माघाताचा त्रास होत आहे.  गेल्या २८ दिवसात २३ जणांना उष्माघात झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उष्णाघाताने एकही मृत्यू झाल्याचे समोर आलेले नाही. 

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


राज्यातील अनेक भागात दिवसाचे तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या वर गेले आहे. मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा आहे, कारण शहराचे तापमान ३२ ते ३३ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मात्र राज्याच्या अन्य भागात उष्णतेची लाट आली आहे. या तापमानाने लोकांच्या शरीरातील पाणी कमी होत आहे.

मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागात उष्माघाताच्या घटना समोर आल्या आहेत. २८ दिवसात उष्माघाताच्या २३ घटना समोर आल्या आहेत. त्यातील १० घटना १० दिवसात घडल्या आहेत. उष्माघाताच्या सर्वाधिक घटना अमरावती जिल्ह्यात घडल्या असून ते तीन रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यानंतर रायगड, पुणे, बीड, बुलढाणा व कोल्हापुरात प्रत्येक २-२ घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर ठाणे, अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड व सातारा जिल्ह्यात उष्माघाताच्या एक-एक घटना समोर आल्या आहेत. उष्माघाताने राज्यात मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये ३० वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू उष्माघाताने झालेल्याते सांगितले जात आहे, मात्र आरोग्य विभागाने याला दुजोरा दिलेला नाही.

मंगळवारी दिवसांची आर्द्रता पातळी ६२ टक्के होती तर रात्रीची आर्द्रता ७६ टक्के होती. दिवसाच्या कडक उन्हामुळे रात्री उष्मा वाढत असून नागरिक उकाड्याने बेहाल झाले आहेत. 

हवमान तज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, राज्याचे तापमान भलेही ४० अंश सेल्सिअसहून अधिक झाले असले तरी सामान्य  पातळीच्या केवळ १ ते २ डिग्री सेल्सिअसने अधिक आहे. सध्या तापमानात मोठा बदल दिसून येत नाही.

एप्रिलमध्ये अजून वाढणार उष्णता -

हवामान विभागाने सांगितले की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईचे कमाल तापमान ३२ ते ३३ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी हीट स्ट्रोकबाबत एडव्हायजरी जारी केली आहे. लोकांनी उन्हात बाहेर पडू नये, सैल व कॉटनचे कपडे परिधान करावेत व पाणी अधिक पिण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य कार्यकर्त्यांनी हीट वेव कृती योजना अंमलात आणण्याची व डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याची मागणी केली आहे.