Virar News: विरार येथील १७ वर्षाचा मुलगा आणि १६ वर्षीय मुलीने अर्नाळा येथील समुद्रात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने, मुलीला वचावण्यात स्थानिकांना यश आले आहे. तर, मुलगा पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेल्याचे सांगण्यात आले. त्याचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले घरातून पळून गेल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली. यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. मात्र, या दोघांनी पोलीस ठाण्यातूनही पळ काढला आणि समुद्रात उडी घेतली. ही घटना शनिवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले विरार येथील एका गृहनिर्माण संस्थेतील रहिवासी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघेही बेपत्ता असल्याने त्यांच्या पालकांनी अर्नाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी त्यांना शोधून काढले आणि त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. पालक पोलीस ठाण्यात औपचारिकता पूर्ण करत असताना दोन्ही मुले बाहेर पडून जवळच्या समुद्रकिनाऱ्याकडे धावले आणि पाण्यात उडी मारली. सतर्क स्थानिकांनी मुलीला बाहेर काढण्यात यश मिळवले. पण मुलगा पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेला. त्याचा शोध सुरू आहे.
विरार येथे ड्युटीवर असताना दोन आरोपी पळून गेल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी फटकारल्याने विरार पोलीस ठाण्यातील एका हवालदाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदाराने रात्री ८ वाजता घरी जाऊन विष प्राशन केले.सुदैवाने त्याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी त्याला जवळच्या संजीवनी खाजगी रुग्णालयात दाखल केले.
विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गस्त घालणाऱ्या दोन घरफोड्यांना गस्ती अधिकाऱ्यांनी संशयावरून ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. या दोघांना पोलीस ठाण्यातील एका बेंचवर बसवण्यात आले. सायंकाळी चार वाजता हवालदाराने लॉकअपच्या बाहेर ड्युटीवर असताना दोन्ही आरोपींनी टॉयलेटमध्ये जाण्याची विनंती केली आणि पोलीस ठाण्यातून पळून गेले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांनी हवालदाराला सुनावले. त्यामुळे तो वैतागला आणि बाथरूममध्ये विष प्राशन केल्याचे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवलेला नाही, जो अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाही. जबाब नोंदवल्यानंतर त्याच्याकडून नेमके कारण कळेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
संबंधित बातम्या