Talathi Bharati: महाराष्ट्र तलाठी भरतीच्या निकालात घोळ? सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Talathi Bharati: महाराष्ट्र तलाठी भरतीच्या निकालात घोळ? सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप

Talathi Bharati: महाराष्ट्र तलाठी भरतीच्या निकालात घोळ? सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप

Jan 25, 2024 08:28 AM IST

Maharashtra Talathi Final Result Declared: महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ परिक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला.

Exam
Exam

Maharashtra Talathi Result 2023: महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी (२४ जानेवारी २०२४) महाभूमीची अधिकृत वेबसाइट www.mahabhumi.gov.in वर जाहीर केला. मात्र, या निकालात घोळ झाल्याचे सांगत महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. तसेच सामान्यीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे, असा त्यांनी आरोप केला आहे.

समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांच्या म्हणण्यानुसार, "तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये झाली. या परीक्षेत पहिल्या १५ उमेदवारांचे सरासरी गुण सामान्यीकरण सूत्रात वापरण्यात आले. पहिल्या क्रमांकाच्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झाला आहे. प्रामाणिक उमेदवारांच्या गुणांच्या आधारे सामान्यीकरण केल्यास गुणवत्ता यादीत बदल होण्याची शक्यता आहे. अशा उमेदवारांच्या गुणांच्या आधारे इतरांचे गुण काढणे चुकीचे आहे. निवड यादी जाहीर करण्याआधी आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु. या आरोपांकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यात आली."

महाराष्ट्र तलाठ्यांची लेखी परीक्षा ३६ जिल्ह्यांमध्ये ५७ सत्रांमध्ये पार पडली. १० लाख ४१ हजार ७१३ नोंदणीकृत उमेदवारांपैकी ८ लाख ६४,००० म्हणजेच ८३.०३ टक्के उमेदवार परिक्षेत सहभागी झाले. अकोला, बीड, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवा, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगरे, मुंबई, नागपूर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यासह सर्व प्रदेशांसाठी निकाल तयार करण्यात आला आहे. सातारा, वाशीम आणि वर्धा यासह सर्व प्रदेशांचा तलाठी भरती निकाल २०२३ जाहीर झाला.

निकाल कसा पाहायचा?

- सर्वप्रथम महाराष्ट्र महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट mahabhumi.gov.in वर भेट द्यावी.

- मुख्य पेजवर तलाठी थेट सेवा भरती-२०२३ जिल्हानिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लिंकवर क्लिक करावी.

- त्यानंतर ज्या विभागातून परीक्षा दिली, तो विभाग निवडा.

- तलाठी थेट सेवा भरती- २०२३च्या निकालाची पीडीएफ स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.

- यादीमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर टाकून तपासा.

- डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर