महायुतीच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका आली समोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 'हे' मान्यवर राहणार हजर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महायुतीच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका आली समोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 'हे' मान्यवर राहणार हजर

महायुतीच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका आली समोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 'हे' मान्यवर राहणार हजर

Dec 04, 2024 02:28 PM IST

Maharashtra New Cm Devendra Fadanvis : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. उद्या आझाद मैदानावर त्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहे.

महायुतीच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका आली समोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 'या' मान्यवरांची उपस्थिती
महायुतीच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका आली समोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 'या' मान्यवरांची उपस्थिती

Maharashtra New Cm Devendra Fadnavis : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून उद्या गुरुवारी आझाद मैदानावर हा शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची शासकीय कार्यक्रम पत्रिका समोर आली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिण्यात आले आहे. या सोहळ्याला देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुक होऊन १० दिवस झाले. अखेर १० दिवसानंतर राज्याच्या मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव निश्चित करण्यात आहे. त्यांचा शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. आझाद मैदानावर हा सोहळा होणार असून या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असा उल्लेख करण्यात आला असून या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज सकाळी पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व समाजाच्या नेत्यांनी अनुमोदन केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गटनेता पदासाठी आणखी कुणाचा प्रस्ताव आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर सर्वांनी नाही म्हटल्यावर रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केली.

शपथविधीसाठी या मान्यवरांची उपस्थिती

गुरुवारी महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

हे मान्यवर राहणार उपस्थित

योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश

नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार

प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश

हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम

विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ

प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा

भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात

नायब सिंग सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा

मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

नराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय

भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान

मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा

पुष्कर सिंग धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड

नामदेव शास्त्री, भगवानगड

राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन

गौरांगदास महाराज, इस्कॉन

जनार्दन हरीजी महाराज

प्रसाद महाराज अंमळनेरकर

मोहन महाराज

जैन मुनी लोकेश

यांच्यासह विविध उद्योगपती व मान्यवर उपस्थित राहणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर