Maharashtra leopard : देशात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. यामुळे बिबट्या आणि मानव संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने देशभारात बिबट्यांची संख्या मोजण्यासाठी प्रगणणा केली होती. याचा अहवाल प्रसिद्ध झाला असून देशात संरक्षित वनक्षेत्रांत तब्बल १३ हजार ८७४ बिबटे असल्याची माहिती अहवालातून पुढे आली आहे. यात सर्वाधिक बिबटे ही मध्यप्रदेशात तर त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
देशभारात वाघ, सिंहानंतर हिंस्त्र प्राण्यांमध्ये बिबट्याचे नाव येते बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक ठार झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. राज्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बिबटे असून हा भाग बिबट प्रवण क्षेत्र म्हणून देखील घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, देश भरात किती बिबटे आहेत याची चर्चा सुरू असतांना केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने बिबट्यांच्या प्रगणनेची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचा अहवाल हा गुरुवारी प्रकाशित झाला. हा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्थांन यांनी देशीतील विविध राज्यांच्या वन विभागाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. त्यानुसार देशभरातील संरक्षित वनक्षेत्रांत तब्बल १३ हजार ८७४ बिबटे असल्याची माहिती ही अहवालातून पुढे आली आहे.
महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १,९८५ असल्याची माहिती पुढे आली आहे. २०१८ साली ही संख्या १,६९० होती. या संख्येत १२२ बिबट्यांची भर पडली आहे. सर्वाधिक बिबटे हे मध्यप्रदेशांत आहेत. येथे ३ हजार ९०२ बिबटे असल्याची नोंद झाली आहे. कर्नाटकात तिसऱ्या क्रमांकाचे बिबटे आहेत. राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५ टक्के संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद अहवालात करण्यात आली आहे.
राज्यात विदर्भ भूप्रदेशातील चंद्रपूर, ब्रम्हपूरी प्रादेशिक विभाग आणि मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बिबट अधिवासाची घनता २०१८ सालच्या तुलनेत वाढली आहे. तर सह्याद्री भूप्रदेशाचा विचार केल्यास सह्यादी व्याघ्र प्रकल्पातील बिबट अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाली आहे.
मध्यप्रदेश ३,९०७, महाराष्ट्र १९८५, कर्नाटक १८७९, तामिळनाडू १.०७०