विद्यार्थ्यांना १० वी, १२ वीच्या परीक्षेसह सर्व महत्त्वाची माहिती आता मोबाईलवर! महाराष्ट्र बोर्डानं तयार केलं ॲप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विद्यार्थ्यांना १० वी, १२ वीच्या परीक्षेसह सर्व महत्त्वाची माहिती आता मोबाईलवर! महाराष्ट्र बोर्डानं तयार केलं ॲप

विद्यार्थ्यांना १० वी, १२ वीच्या परीक्षेसह सर्व महत्त्वाची माहिती आता मोबाईलवर! महाराष्ट्र बोर्डानं तयार केलं ॲप

Dec 09, 2024 05:12 PM IST

MSBSHSE APP : राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व सुविधा यासाठी मंडळाने 'एमएसबीएसएचएसई हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर बोर्डाच्या परीक्षेची माहिती देखील मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना १० वी, १२ वीच्या परीक्षेसह महत्वाची माहिती मिळणार आता मोबाइवर! MSBSHSE तयार केले ॲप
विद्यार्थ्यांना १० वी, १२ वीच्या परीक्षेसह महत्वाची माहिती मिळणार आता मोबाइवर! MSBSHSE तयार केले ॲप

MSBSHSE APP : दहावी बारावी या दोन्ही परीक्षा महत्वाच्या आहेत. या परीक्षांची मुलांप्रमाणे पालकांना देखील चिंता असते. या परीक्षेसंबंधी अनेकदा विद्यार्थ्यांसह पालकांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यांचा हा मनस्ताप कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांना रीतसर माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने मोबाइल एमएसबीएसएचएसई अ‍ॅप तयार केले आहे. या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना वेळापत्रक, गुणपत्रिका, फी यासह अनेक महत्त्वाच्या परीक्षेशी संबंधित माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसत असतात. त्यांना शाळांमधून माहिती दिली जाते. मात्र, सोशल मीडिया व काही खाजगी कोचींग क्लासेसच्या माध्यमांतून माहितीची शहानिशा न करता ती फॉरवर्ड केली जात होती. त्यामुळे अनेकदा गैरसमज व अफवा पसरत होत्या. त्यामुळे परीक्षा मंडळाने एमएसबीएसएचएसई अ‍ॅप सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. एमएसबीएसएचएसई ने तयार केलेले हे अ‍ॅप दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना वापरता येईल, तसेच परीक्षा आणि इतर माहितींचे नोटिफिकेशनही विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, हे अ‍ॅप गूगल पले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप, विद्यार्थी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी एक सोयीस्कर ठरणार आहे. यात दहावी आणि बारावी या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे वेळापत्रक समाविष्ट आहे. हे ॲप राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरील लिंकद्वारे डाउनलोड करता येणार आहे.

गोसावी म्हणाले, "एकदा ॲपचा व्यापक वापर होताच, आम्ही अतिरिक्त फीचर या अ‍ॅपमध्ये देण्याच्या विचारात आहोत. हे ॲप केवळ विद्यार्थी व पालक यांच्या सोईसाठी तयार करण्यात आले आहे. शाळा व विद्यालयातील इतर संदेश सुविधा या पूर्ववत सुरू राहणार आहेत.

एमएसबीएसएचएसई अ‍ॅपची वैशिष्ट्ये

गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध. विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांना या अॅपवर लॉगईंन करता येणार आहे. नमुना प्रश्नपत्रिका, वेळापत्रक, निकाल यासह सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुणांसह अन्य सुविधा शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्य नवीन सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगीनशिवाय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असे डाउनलोड करा एमएसबीएसएचएसई अ‍ॅप

परीक्षा बोर्ड 'एमएसबीएसएचएसई' हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी किंवा पालक हे अ‍ॅप डाउनलोड करून वापरू शकतात. यात लॉगीन करण्यासाठी मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करावी लागणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर