Maharashtra State Board HSC SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहे तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) २१ फेब्रवारी ते १७ मार्च दरम्यान आयोजित केली आहे. ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यास व त्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सुविधा उपलब्घ करून देण्यात आली आहे. राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी व परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते सात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आदीबाबत शंका समुपदेशकांना विचारू नयेत, असे राज्य परीक्षा मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी म्हटले आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी - बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत (Maharashtra board exams 2025) विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोर्डाकडून हेल्पलाइन व नियंत्रण केंद्राची घोषणा केली आहे. पालक व विद्यार्थी इथे संपर्क साधून शंकांचे निरसन करून घेऊ शकतात. ही सुविधा आज, ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २८ मार्चमध्ये होणार आहे. यासंदर्भात विद्यार्थी, पालक किंवा इतर संबंधितांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हे नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या