SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी १० वीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत पर पडणार आहे. या वर्षी तब्बल १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी राज्य मंडळाने विविध उपाय योजना केल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी याचा परीक्षेवर परिणाम होणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शरद गोसावी म्हणाले, परीक्षेची तयारी करण्यात आली असून सर्व केंद्रांना सूचना करण्यात आल्या आहेत. परीक्षेत गैर प्रकार टाळण्यासाठी तब्बल २७१ भरारी पथके तयार करण्यात आले आहे. तसेच परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तरपत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक परीरक्षक बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तर तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार आहेत. सहायक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे. राज्य मंडळाच्या भरारी पथकासह जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
गेल्या वर्षी परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा सहा हजार खासगी आणि आठ हजार पुनर्परीक्षार्थी वाढले आहेत. ही परीक्षा ५९,४७८ विद्यार्थी, ७,४९,९११ विद्यार्थीनी व ५६ तृतीय पंथी देणार आहेत. एकूण २३२७२ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५०८६ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून सरल डेटावरुन माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने १० वीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षाथ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यान आलेल्या प्रवेशपत्रातही नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स. १०:३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
गेल्या वर्षीप्रमाणेच मार्च २०२४ परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत. लेखी परीक्षेपूर्वी या प्रकरणी विद्याथ्यार मागील बाजूस असलेल्या सूचनांचे विद्या करणेबाबत सर्व माध्यमिक शाळा सूचित करण्यात आलेले आहे.
संबंधित बातम्या