HSC SSC Exam Dates : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, यंदाच्या परीक्षेत असणार ‘हा’ मोठा बदल-maharashtra state board 10th 12th ssc hsc exam date 2024 25 announced educational news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC SSC Exam Dates : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, यंदाच्या परीक्षेत असणार ‘हा’ मोठा बदल

HSC SSC Exam Dates : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, यंदाच्या परीक्षेत असणार ‘हा’ मोठा बदल

Aug 12, 2024 08:11 PM IST

SSC HSC Exam Dates : परीक्षा मंडळाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील परीक्षांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीमध्ये यावेळी१० दिवसांचा फरक असणार आहे.

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

यंदापासून मोठा बदल होणार -

परीक्षा मंडळाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील परीक्षांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीमध्ये यावेळी १० दिवसांचा फरक असणार आहे. यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ऐवजी ११ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्च ऐवजी २१ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. तर, दहावीची परीक्षा  २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यासोबत हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे यादृष्टीने या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

बोर्डाच्या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय?

बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यत जाहीर होईल, असा अंदाज बोर्डाने वर्तवला आहे. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा विचार करुन सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी  दहावी आणि बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १८ ते १० दिवस आधी घेण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने  लेखी , प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा  पुढील तारखांना घेण्याचे  नियोजन असल्याचं  मंडळाकडून  सांगण्यात आलं आहे. 

दहावी बारावीच्या परीक्षांच्या संभाव्या तारखा -

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा - मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार,  १८  मार्च २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार २४ जानेवारी २०२५  ते सोमवार  १० फेब्रुवारी २०२५

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा : शुक्रवार २१ फेब्रुवारी २०२५  ते सोमवार १७  मार्च २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार २० फेब्रुवारी २०२५

विभाग