मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra SSC Results 2024: उद्या दहावीचा निकाल, ऑनलाईन गुण तपासताना ‘या’ बाबी ठेवा लक्षात

Maharashtra SSC Results 2024: उद्या दहावीचा निकाल, ऑनलाईन गुण तपासताना ‘या’ बाबी ठेवा लक्षात

May 26, 2024 10:35 PM IST

Maharashtra SSC Results 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या दहावीचा निकाल उद्या, २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल. ऑनलाइन गुण आणि इतर तपशील तपासताना खालील मुद्द्यांवर लक्ष द्या.

उद्या दहावीचा निकाल (HT file image)
उद्या दहावीचा निकाल (HT file image)

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या, २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. एमएसबीएसएचएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील. एमएसबीएसएचएसईचे अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या दोन संकेतस्थळांव्यतिरिक्त msbshse.co.in sscresult.mkcl.org आणि डिजिलॉकर अॅपवरही (results.digilocker.gov.in) निकाल पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव टाकावे लागेल.

निकाल लागल्यानंतर, उमेदवारांनी स्कोअरकार्डवर खालील तपशीलांची पडताळणी करणे आवश्यक आहे:

  • उमेदवाराचे नाव
  • रोल नंबर
  • मिळालेला गुण
  • शाळेचे नाव
  • पात्रता स्थिती

यावर्षी राज्यभरात १५ लाखांहून अधिक उमेदवारांनी दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा १ मार्च रोजी सुरू झाली आणि २६ मार्च २०२४ रोजी संपली. महाराष्ट्र एसएससी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दुसरी शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली.

निकालाबरोबरच एमएसबीएसएचएसई एकूण उत्तीर्ण टक्केवारी, लिंग निहाय टक्केवारी, जिल्हा निहाय कामगिरी आणि इतर महत्वाच्या तपशीलांची देखील माहिती सामायिक करणार आहे. तथापि, बोर्ड बहुधा टॉपर्सची यादी जाहीर करणार नाही.

२०२३ मध्ये महाराष्ट्र एसएससीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला होता. गेल्या वर्षी दहावीचा ९३.८३ टक्के निकाल लागला होता. निकालात मुलींचे उत्तीर्ण टक्केवारी ९५.८७ टक्के, तर मुलांची टक्केवारी ९२.०६ होती.  कोकण विभाग गेल्या वर्षी अव्वल ठरला होता.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 पाहण्यासाठी स्टेप्स:

  • एमएएच निकालाच्या अधिकृत वेबसाइटवर mahresult.nic.in वर जा.
  • होम पेजवर, महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन तपशील द्या आणि सबमिटवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर प्रदर्शित होणारा एसएससी निकाल पाहा.
  • पेज डाऊनलोड करा आणि पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

 

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग