SSC, HSC 2024 Result: इयत्ता दहावी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाहीत, महाराष्ट्र बोर्डाकडून स्पष्ट!-maharashtra ssc hsc results to not be announced today confirms chairman ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC, HSC 2024 Result: इयत्ता दहावी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाहीत, महाराष्ट्र बोर्डाकडून स्पष्ट!

SSC, HSC 2024 Result: इयत्ता दहावी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाहीत, महाराष्ट्र बोर्डाकडून स्पष्ट!

May 10, 2024 02:12 PM IST

MSBSHSE 10th, 12th Result Updates: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार नसल्याचे महाराष्ट्र बोर्डाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाही,
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाही,

Maharashtra Board Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता दहावी (SSC) आणि इयत्ता बारावीचा (HSC) निकाल शुक्रवारी (१० मे २०२४) जाहीर होईल, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत गेल्या दोन दिवसांपासून झळकत होत्या. यावर महाराष्ट्र बोर्डाने प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल आज रोजी जाहीर होणार नसल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. मात्र, यानंतर इयत्ता दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ कालावधीत पार पडली. तर, इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च या दरम्यान झाली. यंदा बारावीच्या परीक्षेला ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुली असे एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दहावीच्या परीक्षेत जवळपास १६ लाख विद्यार्थी बसले होते. यातील ३ लाख ६४ हजार ३१४ विद्यार्थी फक्त मुंबईतील आहेत.

Mumbai Rape: लैंगिक संबंध ठेवल्यास नोकरी मिळेल; काळ्या जादूच्या नावाखाली बरोजगार महिलेवर बलात्कार, भोंदू बाबाला अटक

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कसा तपासायचा?

- सर्वप्रथम mahresult.nic.in एमएएच निकालाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

- होम पेजवर उपलब्ध महाराष्ट्र एसएससी, एचएससी निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.

- पुढे हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.

- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

- निकाल तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट डाउनलोड करा.

Mumbai Womens Abuses Police : मुंबईत तीन मद्यधुंद तरुणींची पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण, नेमकं प्रकरण काय?

परीक्षा १ मार्चपासून सुरू होऊन २६ मार्च २०२४ रोजी संपली आणि बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली. महाराष्ट्र एसएससी, एचएससी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दुसरी शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार एमएसबीएसएचएसईची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

विभाग