मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 17, 2024 03:37 PM IST

Maharashtra SSC HSC Board Result 2024 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. त्याआधी बारावीचा निकालही जाहीर होणार आहे.

प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी? (छायाचित्र - प्रातिनिधिक)
प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी? (छायाचित्र - प्रातिनिधिक)

Maharashtra SSC HSC board result 2024 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं (SSC board) घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असून बारावीचा निकाल त्या आधी जाहीर होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या हवाल्यानं टीव्ही ९ मराठीनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात, म्हणजेच पुढच्या आठवड्यात लागणार आहे. तर, दहावीच्या निकालाआधी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे, असं गोसावी यांनी सांगितलं. अर्थात, निकालाची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

कुठे पाहता येणार निकाल?

mahresult.nic.in, mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.

कसा पाहायचा निकाल?

> सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

> वेबसाइटच्या होमपेजवर गेल्यावर ‘MAHA SSC Result 2024’ किंवा ‘MAHA HSC Result 2024’ या पर्यायांवर क्लिक करा.

> त्यानंतर विचारण्यात आलेल्या माहितीनुसार हॉल तिकीटावरचा क्रमांक आणि आईचं नाव टाकून सबमिट करा.

> तुमचा निकाल तुमच्या समोर दिसेल.

> भविष्यातील संदर्भासाठी निकालाची एक कॉपी डाऊनलोट करून तुमच्या जवळ ठेवावी.

दहावीचे १६ लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च या कालावधीत पार पडली. या परीक्षेला जवळपास १६ लाख विद्यार्थी बसले होते. यातील ३ लाख ६४ हजार ३१४ विद्यार्थी मुंबईतील आहेत.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत झाली. यावेळी बारावीच्या परीक्षेला एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यात ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुलींचा समावेश होता. आता या दोन्ही परीक्षांमध्ये कोण बाजी मारणार, कोणता विभाग अव्वल ठरणार याविषयी उत्सुकता आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग