Maharashtra SSC 10th Result : प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल लागणार २७ मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra SSC 10th Result : प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल लागणार २७ मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली

Maharashtra SSC 10th Result : प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल लागणार २७ मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली

Updated May 25, 2024 01:32 PM IST

Maharashtra SSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra SSC Result 2024 Date : १२ वीचा निकाल लागल्यावर १० वीचा निकाल कधी लागणार या बाबत प्रतीक्षा होती. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील या बाबत काही दिवसांपूर्वी अपडेट दिली होती. त्यानुसार पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.

Karad News : कराड हळहळले! थोरल्या भावाला वाचवताना धाकट्याला विजेचा शॉक; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू!

बोर्डा कडून बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यानंतर १० वीच्या निकाला बाबत प्रतीक्षा होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ २७ मे रोजी १० वीचा निकाल जाहीर करणार आहे. ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत घेण्यात आली होती. विभागीय मंडळाने पेपर तपासणी पूर्ण केली आहे.

Mumbai Megablock : मुंबईकरांनो रविवारी फिरायला जायचा प्लॅन करत आहात तर ही बातमी वाचा! उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

येथे पाहता येणार निकाल

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना mahresult.nic या बोर्डाच्या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल पाहता येणार आहे. तर आणखी काही संकेतस्थळावर देखील निकाल जाहीर केला जाणार आहे. या सोबतच डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे. आसन क्रमांक टाकून निकाल हा पाहता येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर