मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लांडगे विकले गेले, निष्ठावंत माझ्यासोबत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची डरकाळी

लांडगे विकले गेले, निष्ठावंत माझ्यासोबत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची डरकाळी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 27, 2023 09:26 AM IST

Uddhav Thackeray Slams Eknath Shinde: ठाणे दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray (HT)

Uddhav Thackeray Thane : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधून शिंदे गटावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरे म्हणाले की,"निष्ठेच्या पांघुरड्याखाली काही लांडगे घुसले होते, त्यांच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, शिवसेनेचीही बदनामी झाली. जाणाऱ्यांना जाऊद्या निष्ठावंत माझ्यासोबत आहेत. कोण विकले गेले? हे सर्वांनाच माहिती आहे. एका गोष्टीचे समाधान आहे. राज्यात सध्या जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा राजकारणात आला आहे. तो दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. लवकरच ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाण्यात जाहीर सभा घेणार घेणार आहे, सभेत कोणाचा समाचार घ्यायचा, तो मी घेईन", असे उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौऱ्यात म्हटलंय आहे.

उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी"लोकशाहीत प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो”, अशी प्रतिक्रिया दिली.

IPL_Entry_Point