Maharashtra Rains: मुंबई, पुण्याला पावसाने झोडपले,रस्त्यावर साचले पाणी; नागरिकांचे हाल!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rains: मुंबई, पुण्याला पावसाने झोडपले,रस्त्यावर साचले पाणी; नागरिकांचे हाल!

Maharashtra Rains: मुंबई, पुण्याला पावसाने झोडपले,रस्त्यावर साचले पाणी; नागरिकांचे हाल!

Jun 09, 2024 10:40 AM IST

Mumbai Pune Waterlogging: महाराष्ट्रात शनिवारी रात्री बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुक कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्या.

मुंबईत शनिवारी पावसाने हजेरी लावली.
मुंबईत शनिवारी पावसाने हजेरी लावली.

Mumbai News: मुंबईत शनिवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. येत्या दोन दिवसांत मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे सांगून हवामान विभागाने आज शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे आणि रायगडसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.या भागांत विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळे आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आज बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही आयएमडीने नागरिकांना दिला आहे. भारतीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशा आणि किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशच्या काही भागांत पुढे सरकला आहे.

महिन्याभराचा पाऊस पडला एका दिवसात

पुण्यात शनिवारी (८ जून २०२२) रात्री ८.३० वाजेपर्यंत १९३.८ मिमी पावसाची नोंद झाली, जून महिन्यातील सरासरी पाऊस होता. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, या वर्षी याच कालावधीत जून २०१८ नंतर शहरात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पुण्यात जून महिन्यातील सरासरी पाऊस १७८.४ मिलिमीटर आहे. १ जून ते ८ जून या कालावधीत सरासरी ४४.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ८ जूनपर्यंत पुण्यात १९३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुण्यातील पावसात वाढ होण्याची शक्यता

जून २०२३ आणि जून २०२२ मध्ये शिवाजीनगरमध्ये ८९.० मिमी आणि ३५.० मिमी पाऊस पडला. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये सर्वाधिक 221.7 मिमी पाऊस 2020 मध्ये झाला होता, त्यानंतर 2019 मध्ये 197.9 मिमी पाऊस पडला होता.यंदा पुणे शहरात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, येत्या काही दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन

आयएमडीच्या हवामान आणि पूर्वानुमान विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, "महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होईल. पुण्यात ही सक्रियता जोरदार राहणार असून आयएमडीने ९ जून रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट आणि पुणे शहरासाठी १० जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर