मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: भीमा नदीत आढळलेल्या सात मृतदेहांचे गूढ उलगडले; चक्रावून टाकणारे सत्य समोर

Pune: भीमा नदीत आढळलेल्या सात मृतदेहांचे गूढ उलगडले; चक्रावून टाकणारे सत्य समोर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2023 07:38 PM IST

Pune Suicide: पुण्याच्या दौंड येथे मुलगी पळून गेल्याने बेअब्रू झाल्याची भावना मनात ठेवून घरातील एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Pune Sucide
Pune Sucide (HT_PRINT)

Pune Sucide: मुलगी पळून गेल्याने समाजात बदनामी होण्याच्या भीतीने एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पुण्याच्या दौंड येथील घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. दौड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात आज तीन लहान मुलांसह एकूण सात जणांचे मृतदेह सापडले होते. सुरुवातीला पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला. मात्र, पोलीस चौकशीत मृत व्यक्तींनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

मोहन उत्तर पवार (वय, ५०) आणि संगीता मोहन पवार (वय, ४५) त्यांची मुलगी राणी शामराव फुलवरे (वय, २७ वर्ष) जावई शामराव पंडित फुलवरे आणि नातू मुले रितेश फुलवरे (वय,७ वर्ष), छोटू फुलवरे (वय, ५ वर्ष) आणि कृष्णा फुलवरे (वय, ३ वर्ष) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आले. सुरुवातीला पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला. पण मुलगी पळून गेली म्हणून या सात जणांनी आत्महत्या केल्याची पोलीस चौकशीत उघड झाले.

शिरूर - चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

IPL_Entry_Point

विभाग