मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना जीन्स-टी शर्ट वापरण्यास मनाई; ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना जीन्स-टी शर्ट वापरण्यास मनाई; ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार

मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना जीन्स-टी शर्ट वापरण्यास मनाई; ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार

Published Mar 15, 2024 11:27 PM IST

Teachers Dress Code : राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत सर्व व्यवस्थापनातील शाळांच्या महिला व पुरुष शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिक्षकांच्या नावामागे tr लावले जाणार आहे.

शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार
शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार

Teachers Dress Code : राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील सर्व सर्व शाळांच्या शिक्षकांसाठी मोठी निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षकांसाठी आता ड्रेस कोड लागू होणार आहे. नव्या नियमानुसार शाळेत आता शिक्षकांना टी-शर्ट किंवा जीन्स पँट परिधान करून येता येणार नाही. त्याचप्रमाणे जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr. लावतात, वकिलांच्या नावामागे Ad लावतात त्याचप्रमाणे आता शिक्षकांच्या नावामागे Tr.  लावले जाणार आहे. ही घोषणा राज्याच्या शिक्षण खात्याने केली आहे. 

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष व महिला शिक्षकांसाठी संबंधित शाळा ड्रेसकोडचा रंग निश्चित करेल. त्यानंतर या ड्रेसकोडचे पालन करणे बंधनकारक राहील असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

शिक्षकांच्या नावामागे  मराठीमध्ये टी असं लिहिण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. नावामागे Tr अक्षर लागल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक हे त्यांच्या  नावानेच ओळखले जाणार आहेत. शिक्षकांच्या नावावरुनच आता वकील व डॉक्टरांप्रमाणे त्यांचे प्रोफेशन समजणार आहे. 

राज्यातील शिक्षकांना ड्रेसकोड लागू केल्यानंतर महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव करावा लागणार आहे. तर पुरूष शिक्षकांना गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन केलेला असावा.

सरकारने केवळ कपडेच नाही तर महिला व पुरुष शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या चप्पल घालाव्यात याबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे. या शासन पत्रकात शिक्षकांनी कुठले बूट घालावेत. कशा चपला घालाव्यात महिला शिक्षकांच्या चपला कशा असाव्यात याबाबत नियमावली देण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या