Maharashtra Cabinet Decisions : पुण्यासाठी महत्वाची बातमी आहे. विदर्भात जाण्यासाठी प्रमुख मार्ग असणारा समृद्धी महामार्ग हा पुण्याला जोडला जाणार आहे. पुणे आणि शिरूर दरम्यान, ५३ किमीच्या रस्त्याच्या कामास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. हा सहा पदरी उड्डाण मार्ग असून अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील केसनंद येथे हा मार्ग जोडला जाणार आहे.
पुण्यात विदर्भातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच व्यापार देखील मोठा आहे पुणे ते नागपुर अंतर कमी करण्यासाठी मागणी होत होती. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तयार झाल्यावर हा मार्ग पुण्याला जोडण्याची देखील मागणी होती. त्यानुसार या मागणीवर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत विचार करण्यात आला. या मार्गाला मंजूरी देण्यात आली आहे.
५३ किमीचा मार्ग बांधण्यासाठी खर्चाला देखील मंजूरी देण्यात आली आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील केसनंद गावातून या उड्डाण मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासाठी ७ हजार ५१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे - शिरूर - अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर हा सहा पदरी उड्डाण मार्ग तयार केला जाणार आहे. प्रस्तावित उड्डाणमार्ग पुढे अहमदनगर व पुढे छत्रपती संभाजी नागरमार्गे समृद्धी महामार्गाला देखील जोडले जाणार आहे. या साठी २०५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च ९५६५ रुपये लागणार असून हा मार्ग २५० किमीचा होणार आहे.