Mumbai News: मुंबईतील बोरिवली येथील पाण्याची पाइपलाइन फुटल्याने शुक्रवारी सायंकाळी परिसरातील रस्ते जलमय झाले. बोरिवलीतील शिंपोली मेट्रो स्थानकाजवळील पाण्याची पाइपलाइन फुटली. त्यानंतर परिसरात पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. एएनआय वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात वाहनचालकांना गाडी चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीतील शिंपोली मेट्रो स्थानकाजवळील शुक्रवारी संध्याकाळी पाण्याची पाइपलाइन फुटली. त्यानंतर काहीच वेळात परिसरात गुघड्याभर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली, अशी माहिती एएनआयने दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरच्या माध्यमातून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहेत, ज्यात पाइपलाइन फुटून रस्त्यावर पाणी वाहताना दिसत आहे. या घटनेची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. रस्त्यावरील वाहून जाणारे पाणी थांबवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.